आयुषमंत्री श्रीपाद नाईक घरी परतले

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आज कोविडमुक्त झाले. त्यांना दोनापावल येथील मणिपाल इस्पितळातून घरी पाठवण्यात आले. रायबंदर येथील निवासस्थानी जाताना वाटेत त्यांनी देवदर्शनही घेतले.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आज कोविडमुक्त झाले. त्यांना दोनापावल येथील मणिपाल इस्पितळातून घरी पाठवण्यात आले. रायबंदर येथील निवासस्थानी जाताना वाटेत त्यांनी देवदर्शनही घेतले.

नाईक यांना १४ ऑगस्ट रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना प्राणवायू देण्यात येत होता. त्यांनी बरे झाल्यानंतर सातत्याने उपचारावर नजर ठेवून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी उपचारात मदत केलेले डॉ. मंजुनाथ देसाई, आयुष सचिव राजेश कोटेचा, मनीष त्रिवेदी, डॉ. मिलींद नाईक, अमोल महालदार, डॉ. गौरेश पलाव, डॉ. मीशा सेठी, डॉ. इलेन रॉड्रिग्ज, डॉ. प्रभू प्रसाद, रीवा बार्नेटो,जिनो पाऊलोस, नम्रता नाईक, डॉ. अनंत मोहन, डॉ. राजेश्वरी, डॉ. रणदीप गुलेरीया, डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. शेखर साळकर आदींचे त्यांनी आभार मानले आहेत.

नाईक म्हणाले, लोकसेवा करण्याची मला आणखीन एक संधी दिल्याबद्दल मी सर्वसमर्थ ईश्र्वर आणि मातृभूमीचे आभार मानतो. 

संबंधित बातम्या