coronavirus: गरोदर असताना कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 मे 2021

या कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, नर्स रात्रदिंवस रुग्णांची सेवा करत आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असताना दुसऱ्या लाटेमुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. देशातील काही राज्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कोरोना संकटाच्या काळात डॉक्टर, नर्स रात्रदिंवस रुग्णांची सेवा करत आहेत. तज्ञांनी देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र या भितीदायक वातावरणामध्येही डॉक्टर (Doctor), नर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. सरकारने या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना योध्द्यांचा दर्जा दिला आहे. मात्र छत्तीसगढच्या(Chhattisgarh) नर्सचे समर्पण पाहता असे दिसते की, या कोरोना योध्द्यांचे बलिदान हे शहीदांपेक्षा कमी लेखता येणार नाही. (coronavirus Death of a nurse who treats coronavirus patients while pregnant)

छत्तीसगढच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून ही घटना समोर आली आहे. एक नर्स आपल्या आयुष्याची पर्वा न करता रात्रदिंवस कोरोना रुग्णांची सेवा करत होती. 9 महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वार्डामध्ये ड्यूटी करत होती. परंतु दुर्देवाने याच काळात तिला कोरोनाची लागण झाली. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नर्स प्रभा बंजारे यांची ड्यूटी मोरमाली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, खैरवार खुर्द येथे होती. त्या नऊ महिन्यांच्या गर्भवती असताना नियमित कोरोना रुग्णांची सेवा करत होत्या. गरदोरपणात त्या गावात भाड्याने रुम घेऊन एकट्याच राहत होत्या. तिथूनच त्या रुग्णालयामध्ये जात होत्या.

corona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर...

प्रभा यांचे पती भोजराज म्हणाले,  ''प्रभा नऊ महिन्यांची गर्भवती असतानाही त्या अशा अवस्थेत कोरोना रुग्णांची सेवा करत होती. 30 एप्रिलला तिला बाळंतपणासाठी कवर्धा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे तिने सिझरियन ऑपरेशनद्वारे एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी रुग्णालयामध्ये राहत असताना तिला बऱ्याच वेळा ताप येत असत. डिस्चार्जनंतर ती घरी आल्यानंतर तिला जास्त प्रमाणात खोकला देखील जाणवू लागला होता.''

प्रभा यांची कोरोनाची प्राथमिक चाचणी चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना कवर्धा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे तात्काळ त्यांना रायपूर येथे हालविण्यात आले. दरम्यान उपचार सुरु असताना 21 मे रोजी त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पती भोजराज यांनी सांगितले की, ''त्यांना प्रभाला अनेक वेळा वेळा रजा घेण्यास सांगितले, परंतु गर्भवती असतानाही प्रभाने तिचे कर्तव्य बजावले.''

संबंधित बातम्या