Coronavirus :ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास मेंदूवर होऊ शकतो घातक परिणाम!

BRAIN  1.jpg
BRAIN 1.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता श्वसन यंत्रणेवर या कोरोनाच्या विषाणूचा (virus) मोठा प्रभाव पडत. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. तसेच त्याचा परिणाम फक्त श्वसन यंत्रणेवरच होत नाही तर मेंदूवरही (brain) होत आहे. कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑक्सिजन (Oxygen) सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये ही बाब प्रकर्षाने दिसून येत आहे. या कोरोना रुग्णांमध्ये भ्रम निर्माण होणे, मानसिक स्थितीमध्ये बदल होणे अशा समस्या समोर येत आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदुमधील ग्रे मॅटर (Gray Matter) कमी झाल्याने असे होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. रुग्णांच्या मेंदूचे सीटी स्कॅन  (CT scan) केल्यानंतर ग्रे मॅटरची मोजणी करण्यात आली त्यामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा परिणाम फक्त श्वसनावरच नाहीतर मेंदूवरही होत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया प्रातांतील (province of Georgia) एका विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतर एवढा प्रभाव पडत नाही असंही तज्ञांनी सांगितले आहे. (Coronavirus Decreased oxygen levels can have a detrimental effect on the brain)

ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते त्या रुग्णांमध्ये ग्रे मॅटर वॉल्यूम कमी झाल्याचे दिसून आले आहे. मात्र ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही अशा रुग्णांमध्ये कोणत्याही स्वरुपाचा बदल दिसून आलेला नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूमधील फ्रंटल टेम्पोरल (Frontal temporal) नेटवर्कवर परिणाम होत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. कोरोना झालेल्या ज्या रुग्णांना व्हेंटिलेटर (Ventilator) आणि ऑक्सिजनची आवश्यकता असते, अशा रुग्णांना मेंदूचा विकार होण्याचा धोका जास्त आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

ग्रे मॅटर नेमकं आहे तरी काय?
आपल्या मेंदूतील ग्रे मॅटर नर्वस सिस्टमचा भाग आहे. स्पर्श जाणवणे, मसल्स कंट्रोल, ऐकणे, बघणे, आठवणे, आपल्या मानवी भावना बोलणे, निर्णय घेण्याची क्षमता तसेच आत्मविश्वास या सारख्या गोष्टी अवलंबून असतात. मानवी मेंदूचे चार भाग असतात. त्यामधील पुढील भागाला फ्रन्टल लोब तसेच मागच्या भागाला पेरिएंटल लोब कानाजवळच्या भागाला टेम्पोरल लोब आणि कानामागील भागाला ऑकिपिटल लोब असं म्हटलं जातं. ज्या कोरोना रग्णांमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाली आहे त्या कोरोना रुग्णांना फ्रन्टल लोबमध्ये ग्रे मॅटर कमी झाल्याचे दिसून आले आहे. तसेच ज्या रुग्णांना ताप आला आहे, अशा रुग्णांमध्ये टेम्पोलर लोबमध्ये ग्रे मॅटर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com