कोविड 19: भारतात चोवीस तासांत ६५ हजार ८१ रुग्ण बरे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

६९ हजार ९२१ नव्या रुग्णांची नोंद, २४ तासांत ८१९ मृत्यू

नवी दिल्ली: दरदिवशी ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा सलग पाच दिवस चाललेला कल कायम ठेवत, मागील चोवीस तासात भारतात ६५ हजार ८१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ३९ हजार ८८२ असून त्यानुसार कोविड-१९ च्या रुग्णांचा बरे होण्याचा दर आणखी वाढून ७७ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३.६१ पटीने जास्त आहे.

भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख ८५ हजार ९९६ असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २०.५३ लाखाहून जास्त आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चार पट वाढली आहे. 

पाच राज्यांमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण बरे होऊन घरी पाठवल्याचीही नोंद झाली असून ती संख्या देशभरातल्या ६५ हजार ८१ बरे झालेल्या रुग्णांच्या ५८.४ टक्के आहे. महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले असून आंध्र प्रदेशात ८ हजार ७७२, कर्नाटकात ७ हजार २३८, तमिळनाडूत ६००८ तर उत्तर प्रदेशात ४ हजार ५९७ कोविड रुग्ण बरे झाले आहेत. वरील पाच राज्यांमध्ये मिळून गेल्या चोवीस तासात एकूण ५३६ मृत्यूची नोंद झाली असून देशभरात झालेल्या एकूण मृत्यूच्या संख्येच्या (८१९) तुलनेत हे प्रमाण ६५.४ टक्के आहे. महाराष्ट्रात १८४ मृत्यू नोंदवले गेले, तर कर्नाटकात ११३, त्याखालोखाल तमिळनाडूत ९१, आंध्रप्रदेशात ८५, तर उत्तर प्रदेशात ६३ मृत्यूची नोंद झाली आहे.

मागील २४ तासात पाच राज्यांतील सर्वाधिक नवे रुग्ण 

  •  महाराष्ट्र     - 11,852 
  •  आंध्रप्रदेश    - 10,004 
  •  कर्नाटक    - 6,495 
  •  तामिळनाडू    - 5,956 
  •  उत्तर प्रदेश    - 4,782

या पाच राज्यांमधील रुग्णांची एकूण संख्या मागील २४ तासात देशभरात आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येच्या ५६ टक्के इतकी आहे.

संबंधित बातम्या