Coronavirus: सैन्यातील सेवानिवृत्त डॉक्टर देशाच्या मदतीला...

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 15 मे 2021

शुक्रवार पासून देशभरातील नागरिकांसाठी मोफत ऑनलाइन वैद्यकीय सल्ला सेवा सुरू केली.

कोरोनाच्या वाढत्या(Corona Second Wave) संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करातील सेवानिवृत्त डॉक्टरांनी (Doctor) शुक्रवारपासून देशभरातील नागरिकांसाठी मोफत ऑनलाइन वैद्यकीय सल्ला सेवा सुरू केली. ही सेवा उत्तर प्रदेशसाठी (UattarPradesh) 7 मे रोजी सुरू करण्यात आली तर आणि काही दिवसांनी राजस्थान (Rajasthan) आणि उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) या सेवेचा विस्तार करण्यात आला. (Coronavirus Retired army doctor to help the country) 

संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, सध्या 85 वरिष्ठ डॉक्टर ऑनलाइन पोर्टलवर आपल्या सेवा देत आहेत आणि त्यांनी एक हजाराहून अधिक रुग्णांना ऑनलाइन सल्ला दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, तीन राज्यातील प्राप्त यशानंतर एक्स-डिफेन्स ओपीडीचे नाव डिफेन्स नॅशनल ओपीडी असे करण्यात आले आहे. 14 मेपासून संपूर्ण देशात त्याचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये सैन्य डॉक्टरांचा दीर्घ अनुभव जास्तीत जास्त वापरला जात आहे.

DRDO चे लवकरच अ‍ॅंटी कोविड औषध '2DG' होणार लॉन्च

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान थलसेना, वायुसेनेच्या आणि नौसेनेचे सेवानिवृत्त डॉक्टरांना वेगवेगळ्या ठिकाणी परत परत बोलवलं जात आहे. सैन्य वैद्यकीय स्थायी आयोग आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या सेवानिवृत्त डॉक्टरांशी पुन्हा करार केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या डॉक्टरांच्या भरतीसाठी डायरेक्टरेट जनरल ऑफ सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (एएफएमएस) च्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

संबंधित बातम्या