Coronavirus: सप्टेंबरपर्यंत येणार सीरमची दुसरी लस; अदर पुनावालांनी व्यक्त केली आशा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

सीरम आणि अमेरिकन व्हॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्होव्हॅक्स यांनी संयुक्तपणे बनवलेली ‘कोव्होवॅक्स’ या दुसऱ्य़ा लसीच्या चाचणीची सुरुवात भारतात  झाली आहे.

पुणे: देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा नव्याने वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. देशात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणालाही सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयामध्य़े मोफत कोरोनाची लस देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी शनिवारी सांगितले की, त्यांची कंपनी यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कोवीड-19 प्रतिबंधक दुसरी लस बाजारात आणणार आहे. सीरम आणि अमेरिकन व्हॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्होव्हॅक्स यांनी संयुक्तपणे बनवलेली ‘कोव्होवॅक्स’ या दुसऱ्य़ा लसीच्या चाचणीची सुरुवात भारतात  झाली आहे. (Coronavirus Second serum vaccine to arrive by September Other Poonawals expressed hope)

कोव्होक्सची चाचणी आफ्रिका आणि ब्रिटनच्या कोवीड-19 विषाणूच्य़ा प्रकाराविरुद्ध घेण्यात आली असून त्याची कार्यक्षमता 89 टक्के असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्यकार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी सांगितले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधूच्या पाणी वाटपाबाबत होणार महत्त्वपूर्ण बैठक

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी संयुक्त विद्यमानाने कोवीशील्ड लसीची निर्मीती केली असून याच कोवशील्ड लसीचा पुरवठा भारत आणि इतर देशांना करण्यात आला आहे. लसीचा तुटवडा होणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. भारतात लसीकरणाची मोहीम योग्य प्रकारे चालू असताना सीरमने आपल्या दुसऱ्या लसीच्या प्रकल्पाकडे वाटचाल सुरु केली आहे. पुण्यात गुरुवारी यासंबंधीच्या चाचण्यादेखील झाल्या आहेत. ब्रिटनमध्ये झालेल्या तिसऱ्य़ा टप्प्यातील चाचण्यामध्ये कोव्होवॅक्सने कोरोना मूळ विषाणूच्य़ा विरुद्ध 96 टक्के कार्यक्षमता दाखवली आहे.

 

संबंधित बातम्या