Coronavirus: 24 वर्षीय जुळ्या भावांचा दुर्देवी मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 मे 2021

सोजा यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला असल्याचे समजताच वडील राफेल तात्काळ त्या दिघांना भेटण्यासाठी गेले होते.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना मेरठमध्ये कोरोनामुळे दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हे दोघे भाऊ केवळ 24 वर्षाचे होते. जोफ्रेड वर्गीज ग्रेगरी (Jofreed Varghese) आणि राल्फेज जॉर्ज ग्रेगरी (Ralfred Varghese) अशी या जुळ्या भावंडाची नावे आहेत. 23 एप्रिल रोजी यांचा वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना ताप आला होता नंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. (Coronavirus Tragic death of 24year old twin brothers)

या दोघा भावंडाचे वडील ग्रेगरी रेमंड राफेल यांनी 23 एप्रिल 1997 रोजी त्यांची पत्नी सोजा हिने दोन जुळ्या भावंडाना जन्म दिला होता तो दिवस त्यांना अगदी स्पष्टपणे आठवतो. सोजा यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला असल्याचे समजताच वडील राफेल तात्काळ त्या तिघांना भेटण्यासाठी गेले होते. दोघेही अगदी सेम टू सेम दिसत होते. त्यानंतर या दोघा भावंडानी पुढे शिक्षण एकत्र घेतले. दोघेही कम्युटर इंजिनियर झाले, दोघांनाही हैदराबादमध्ये नोकरीची संधीही मिळाली होती. दुर्दैवाने दोघांनाही कोरोनाची लागण एकाच दिवशी झाली मात्र त्यांची ही कोरोनावनिरुध्दची लढाई काही तासांच्या अंतराने संपली.

गरीब मुलांसाठी वैद्यकीय सुविधांसह स्वतंत्र गृहनिर्माण केंद्रे स्थापन करा ;...

राफेल यांनी आपल्या जुळ्या मुलांचा मृत्यू कोरोनामुळे होईल असं कधीही वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. दोघेही कोरोनाविरुध्दची लढाई जिंकून सहीसलामत घरी येतील असं राफेल म्हणाले. ''जे ही काही एकाला व्हायचं ते दुसऱ्याला व्हायचं आगदी त्यांच्या जन्मापासून ते दोघे असेच होते. जेव्हा आम्हाला जोफ्राडच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा राल्फेड एकटा घरी येणार नाही असं मी माझ्या पत्निला म्हटलं होतं. जोफ्रेडचा मृत्यू 13 मे रोजी झाला आणि त्यानंतर 14  मे रोजी राल्फ्रेड मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमध्ये काही तासाचं अतंर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

त्या दोघांनी भविष्यात काय करायंच याबद्दल बरचं काही ठरवून ठेवलं होत. आम्हा दोघांना अधिक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी ते धडपडत होते. शिक्षक म्हणून आम्ही त्या दोघांना लहानाचं मोठं करताना अनेक खास्ता खाल्ल्या आहेत. आम्ही त्यांच्यासाठी खर्च केलेल्या पैशापासून ते त्यांना आनंद देण्यापर्यंत सारं काही आम्हाला ते परत करणार होते. त्या दोघांनीही जर्मनी आणि कोरियाला कामासाठी जाण्याचा विचारही केला होता. मात्र देवाने आम्हाला अशी शिक्षा का दिली, हे आम्हाला काहीच कळत नाही,'' असं राफेल म्हणाले. राफेल या  दाम्पत्यांना नेलफ्रेड म्हणून तिसरा मुलगा आहे.

Coronavrius: देशात मागील 5 दिवसात 2 लाख अ‍ॅक्टिव रुग्ण झाले कमी  

मेरठमधील (Meerut) कॅनॉनमेंट परिसरामध्ये राहत असलेल्या राफेल कुटुंबाीयांनी जोफ्रेड आणि राल्फ्रेडवर सुरुवातीला घरीच उपचार केले त्यांना साधा  ताप आला असल्याचं राफेल कुटुंबियांनी वाटलं होतं. ''आम्ही ऑक्सिमीटर घेतला होता. मात्र दोघा भावंडाची ऑक्सिजन लेव्हल 90 पर्यंत खाली आल्यांनतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितले होते,'' असं राफेल यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी झाल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र काही दिवसांनतर त्यांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचं राफेल सागंतात. मात्र अचानक 13 मे ला जोफ्रेडचा मृत्यू झाला आणि एका दिवसाच्या फरकाने म्हणजेच14 मे रोजी राल्फ्रेडचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या