काश्मीरच्या सोपोरमध्ये कौन्सलरवर दहशतवादी हल्ला; कौन्सलर आणि एक सैनिक शहीद

काश्मीरच्या सोपोरमध्ये कौन्सलरवर दहशतवादी हल्ला; कौन्सलर आणि एक सैनिक शहीद
indian army1.jpg

सोमवारी काश्मीरच्या सोपोरमध्ये कौन्सलरच्या बैठकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन कौन्सलर सह पीएसओ जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे. जखमी तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार दहशतवादी हल्ल्यात पीएसओ रियाज अहमद शहीद झाले असून, मुश्ताक अहमद हे गंभीर जखमी झाले आहेत. तर इतरांची प्रकृती गंभीर आहे. (counsellor and a soldier martyred in kashmir during terror attack) 

सोमवारी दुपारी सोपोर (Sopore) येथील लोन बिल्डिंगमध्ये कौन्सलरची बैठक सुरू होती त्यावेळी अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर कौन्सलरवर गोळीबार करून दहशतवादी (Terrorist) तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या वेळी तेथील पोलिसांच्या पीएसओने दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाला. परिसरातील लोक, पोलीस आणि सैन्य कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षादलाने (Securtiy Forces) त्या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलाकडून  प्रत्येक वाहनाचा शोध घेण्यात आला असून, सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गंभीर जखमी झालेले सल्लागार शमसुद्दीन यांना तातडीने श्रीनगर (Shreenagar) येथील इस्पितळात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com