आयोगाची ग्वाही - इव्हीएम भक्कमच

आयोगाची ग्वाही - इव्हीएम भक्कमच
As the counting of votes for Bihar Assembly elections begins the credibility of EVMs is again in question

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू असताना इव्हीएमच्या विश्वासार्हतेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले, मात्र ही यंत्रे निःसंशयपणे भक्कम तसेच फेरफार होण्यापासून अगदी सुरक्षित असल्याची ग्वाही निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.


इव्हीएमचा कार्यभारअसलेले आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही यंत्रे भक्कम असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले असून सर्वोच्च न्यायालयानेही अनेक वेळा विश्वासार्हतेचे समर्थन केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आयोगाने काही राजकीय पत्रांना २०१७ मध्ये खुले आव्हान दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. इव्हीएमच्या गुणवत्तेबाबत दुसऱ्या कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसल्याचेही ते ठामपणे म्हणाले.


काँग्रेस नेत्यांमध्येच मतभेद
इव्हीएमबाबत काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आगेकूच सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते उदित राज यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ देत मल्लीनाथी केली. राज पूर्वी भाजपमध्ये होते. आता ते काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. दुसरीकडे तमिळनाडूतील नेते कार्ती चिदंबरम यांनी ट्विटद्वारे इव्हीएमविषयी अनुकूल मत व्यक्त केले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com