देशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी 
corona update

देशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी 

देशातील कोरोनाच्या (covid-19) रुग्णसंख्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येची परिस्थिती पाहून अनेक राज्यांमध्ये निर्बंध (Restrictions) शिथिल केले जात आहे.  मे महिन्याच्या सुरुवातीला रोज चार लाखांहून अधिक कोरोनाची रुग्णसंख्या होती. मात्र आता मागील 24 तासात देशातील कोरोनाची रुग्णसंख्या एक लाखांच्या खाली आली आहे . गेल्या 24 तासात  80,834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशात (country) कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 94 लाखच्या जवळपास पोहचली असून, कोरोना  संक्रमणामुळे आतापर्यंत 3,70,384 लोकांना आपले प्राण (death) गमवावे लागले आहेत. गेल्या 24 तासांत 1,32,062 रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 2 कोटी 80 लाखांहून अधिक लोक (2,80,43,446) कोरोना साथीच्याविरूद्ध युद्ध जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. देशातील कोरोनाची ॲक्टिव रूग्णसंख्या 10,26,159 आहे. 

आतापर्यंत देशात लोकांना एकूण 25,31,95,048 डोस देण्यात आले आहेत. संसर्ग दर किंवा पॉजिटिविटी रेट हे सलग सहाव्या दिवशी पाच टक्क्यांपेक्षा खाली नोंदवले गेले आहे. देशात 18-44 वयोगातील लसीकरण सुरु आहे. तसेच देशातील लहान मुलांच्या लसीकरणाची चाचणी देखील सुरु आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com