‘देशाला चार राजधान्या हव्यात’, ममता बॅनर्जी यांनी केली मागणी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाला फक्त दिल्लीतच राजधानी नको आणखी चार राजधान्या स्थापन करण्याची मागणी केली आहे.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाला फक्त दिल्लीतच राजधानी नको तर आणखी चार राजधान्या स्थापन करण्याची मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

''भारताला चार राजधान्या असायला पाहिजेत असे माझे हे वैयक्तिक मत आहे. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी कोलकात्यात बसून राज्य केले. तर आपल्या देशात राजधानीचे शहर एकच का?'' असा सवाल यावेळी ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

हे वाचा - चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट उधळला

ममता बॅनर्जी म्हणाल्या की,'नियोजन आयोगाची पुन्हा नव्याने स्थापन करावी. केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर नियोजन आयोगाच्या ठिकाणी निती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. नियोजन आयोग आणि निती आयोग एकत्र राहू शकतात. नियोजन आयोग स्थापन करण्याची संकल्पना ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची होती.'

''नेताजींनी जेव्हा भारतीय लष्कराची स्थापना केली होती, तेव्हा त्यांनी गुजरात, बंगाल, तमिळनाडू या भागातील लोकांना आपल्या लष्करात सामावून घेतले होते. ब्रिटीशांनी भारताला विभाजित करण्यासाठी अवलंबलेल्या फोडा आणि राज्य करा या धोरणाच्या विरोधात प्रकर्षाने उभे राहिले होते. आपण आझाद हिंद स्मारक उभा करुया आणि त्याचे काम कशापध्दतीने केले जाते ते पण आपण दाखवून देऊ’’  असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

संबंधित बातम्या