दिलासादायक बातमी; देशातील कोरोनाचा विळखा होतोय कमी 

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळला होता. मात्र त्यानंतर आता देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण निरंतर कमी होत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण भारतात आढळला होता. मात्र त्यानंतर आता देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण निरंतर कमी होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. याशिवाय देशातील कोरोनाची सक्रिय प्रकरणे दीड टक्क्यांनी खाली आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूची 12,059 प्रकरणे समोर आलेली आहेत. तर 78 जणांना कोरोनाच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; ममता दिदी अनुपस्थित राहण्याची...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 8 लाख 26 हजार 363 वर पोहचली आहे. तर, यापैकी 1 कोटी 5 लाख 22 हजार 601 जण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप परतले परतले आहेत. त्यानंतर सध्याच्या घडीला 1 लाख 48 हजार 766 कोरोनाची सक्रिय प्रकरणे असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने  दिली आहे. याशिवाय देशात 1 लाख 54 हजार 996 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

याशिवाय, देशात कोरोनाचे संक्रमण कमी होत चालल्याचे देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. भारतात मागील वर्षाच्या 25 मार्च रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या 25 वर पोहचली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात यात वाढ होत जाऊन, दिवसाला ही संख्या एक लाखांच्यावर पोहचत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र आता त्यानंतर कोरोनाचे संक्रमण कमी होत चालले आहे. मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाची 176 सक्रिय प्रकरणे कमी झालेली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांचा दार 1.37 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यानंतर, 11,805 जण मागील 24 तासात बरे झाले असून, त्यामुळे देशातील कोरोनाचा रिकव्हरी दर 97.19 टक्क्यांवर पोहचला आहे. आणि मृत्यूदर 1.43 टक्के झाला आहे. 

तसेच, देशात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 20 कोटीहून अधिक कोरोना तपासणी चाचण्या झालेल्या आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कालपर्यंत 20,06,72,589 नमुना चाचणी घेण्यात आलेल्या आहेत. आणि यातील 7,40,794 चाचण्या गुरुवारी ४ फेब्रुवारीला करण्यात आल्याचे आयसीएमआर सांगितले. तर, 57 लाख 75 हजार 322 जणांना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. व यातील 3 लाख 58 हजार 473 जणांना शनिवारी कोरोनाची लस देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.      

    

संबंधित बातम्या