Watch Video: चोरीच्या बाईकवर लैला-मजनूचा खुलेआम रोमान्स, पोलिसांनी घडवली अद्दल

छत्तीसगडमधील हा व्हिडिओ असून दुचाकीवर तरुण-तरुणी रोमान्स करताना दिसत आहेत. दोघांनी गाडीवर अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.
Chhattisgarh viral video
Chhattisgarh viral video Dainik Gomantak

सोशल मिडियावर अनेक आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ समोर येत असतात. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात अनेकजण चुकीच्या आणि धोकादायक स्टंट करतात. मात्र असे स्टंट त्यांच्या अंगलट येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

छत्तीसगडमधील हा व्हिडिओ असून दुचाकीवर तरुण-तरुणी रोमान्स करताना दिसत आहेत. दोघांनी गाडीवर अश्लील कृत्य करताना दिसत आहेत.

(Couple hug while riding stolen motorbike in Chhattisgarh, arrested as video goes viral)

Chhattisgarh viral video
Andaman & Nicobar: अंदमान-निकोबाराच्या विविध बेटांना मोदींनी दिली 'ही' नावे, तुम्हालाही वाटेल अभिमान

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एका जोडप्याचा बाइकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. या व्हिडिओमध्ये, एक मुलगा आणि मुलगी चालत्या बाइकवर रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. मुलगा बाईक चालवत आहे आणि मुलगी बाईकच्या टाकीवर मुलाकडे तोंड करून बसली आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

"बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या आणि अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. या दाम्पत्याकडे कागदपत्रे नसून ते चोरीच्या दुचाकी चालवत असल्याचेही तपासात समोर आले आहे." असे एसपी अभिषेक पल्लव म्हणाले.

Chhattisgarh viral video
Mumbai: माणुसकीला काळिमा फासणारी घटना, 35 वर्षीय इसमाकडून 20 महिन्यांच्या बालकावर लैंगिक अत्याचार

"या बाईकवर कोणताही नोंदणी प्लेट नव्हती आणि तपासादरम्यान ही बाईक एका वर्षापूर्वी गावातून चोरीला गेल्याचे आढळून आले. बाइकची बाजारभाव 1.50 लाख रुपये आहे, मात्र तरुणाने कोणतीही कागदपत्रे नसताना 9 हजार रुपयांना दुचाकी खरेदी केली होती. दुचाकी जप्त करण्यात आली आहे." असेही पल्लव म्हणाले.

याआधी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्येही असाच एक प्रकार समोर आला होता, ज्यात एका मुलाने अल्पवयीन मुलीशी बाईकवर रोमान्स करताना आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुलावर कारवाई केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com