निवडणूक प्रचारात कोरोना नियमांचे उल्लंघन; न्यायालयाने सरकारला विचारला जाब

ECI.jpg
ECI.jpg

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना लॉकडाऊन सारखे निर्बंध लावले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला मात्र देशात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्याने हजारो लोक एकत्र येता आहेत. प्रचार सभा आणि इतर कार्यक्रमांना लोकांच्या चेहऱ्यावर मास्क सुद्धा दिसत नसल्याने आता उच्च न्यायालयानेच निवडणूक अयोग्य आणि केंद्र सरकारला जाब विचारला आहे. (The court asked the election and the central government to address the issue of not wearing masks in the election campaign)

उच्च न्यायालयाने (HIgh court) पश्चिम बंगालसह ५ राज्यांत सुरु असलेल्या निवडणूक (Assembly Elections) प्रचारादरम्यान मास्क लोक मास्क न लावता हजर राहता आहेत, या गोष्टीची गंभीर दखल घेत निवडणूक अयोग (Election Comission) आणि केंद्र सरकारला नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळते आहे. यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान मास्क वापरण्याच्या आवश्यकतेसंदर्भात उच्च न्यायालयाने उत्तरे मागितली आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान लोक मास्कशिवाय का दिसू लागले? असा सवाल कोर्टाने विचारला आहे. निवडणूक आयोगाने कोरोना प्रोटोकॉलविषयी आपल्या वेबसाइटवर, मोबाइल अॅप्स आणि  इतर प्लॅटफॉर्मवर माहिती प्रसारित करण्याचे सांगितले आहे. तसेच  या व्यतिरिक्त डिजिटल, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माध्यमातून निवडणुकीत कोरोना प्रतिबंधक नियमांविषयी जनजागृती करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत.

सध्या देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत चालली असून मृत्युदर देखील वाढताना दिसतो आहे. महाराष्ट्र सारख्या काही राज्यांत लसीचा तुटवडा भासल्याचे देखील समोर आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला निवडणूक सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येताना दिसत आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com