Uttar Pradesh: यूपीचे माजी काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा, दाऊद इब्राहिम...

यूपी काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना एमपीएमएलए न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात शिक्षा सुनावली आहे.
UP EX Congress President Ajay Kumar Lallu
UP EX Congress President Ajay Kumar LalluDainik Gomantak

UP EX Congress President Ajay Kumar Lallu: यूपी काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना एमपीएमएलए न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने अजय कुमार लल्लूंना एक वर्ष कारावास आणि दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. तत्कालीन ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांच्यावर खोटे आरोप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

दरम्यान, अजय कुमार लल्लू यांनी श्रीकांत शर्मा यांच्यावर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. अजय लल्लू यांनी न्यायालयात लावलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

UP EX Congress President Ajay Kumar Lallu
Uttar Pradesh: योगी सरकारची मोठी कारवाई, 1,332 कर्मचार्‍यांना कामावरुन टाकले काढून!

दुसरीकडे, श्रीकांत शर्मा यांनी 2019 मध्ये अजय कुमार लल्लू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी शर्मा यांनी लल्लूंनी माफी मागावी अशी मागणी करणारी नोटीस दिली होती.

अजय कुमार लल्लू यांनी पीएफ घोटाळ्यात आपले नाव जोडल्याचा आरोप शर्मा यांच्यावर केला होता. अशाप्रकारे जिथे जनतेची दिशाभूल झाली, तिथे त्यांची बदनामीही झाली. शर्मा यांनी भविष्य निर्वाह निधीमध्ये कोणतेही पद धारण केलेले नाही किंवा त्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.

UP EX Congress President Ajay Kumar Lallu
Uttar Pradesh: मोदींचा मतदारसंघ पुन्हा चमकणार, नवरात्रीत 1400 कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प काशीला मिळणार

तसेच, 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर अजय कुमार लल्लू यांनी प्रदेश पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी ब्रिजलाल खाबरी आता यूपी काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com