भारत बायोटेकने बनवलेली 'कोव्हॅक्सीन' 81 टक्के प्रभावशाली

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये केंद्र सरकारने कोरोनाची लस जेष्ठ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात देशातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्य़ा कोरोनायोध्द्यांना कोरोना लस देण्यात आली. 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये केंद्र सरकारने कोरोनाची लस जेष्ठ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय घेतला. सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाची ही लस मोफत देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सीरम  इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ऑक्सफर्डच्या 'कोवीशील्ड' आणि भारत बायोटेकने बनवलेल्या 'कोव्हॅक्सीन' या लसींना मान्यता दिली होती. याच पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कोण लिहितं? PMO ने दिली माहिती

भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लस 81 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. 25800 लोकांना लसीकरणामध्ये सहभागी करुन घेण्यात आले. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी कोव्हॅक्सीन 80.6 टक्के प्रभावी आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सीन लसीची निर्मीती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात कोव्हॅक्सीन लस घेऊन आपल्या कृतीतून एक उदाहरण प्रस्तुत केले आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या चेअरमन कृष्णा इला यांनी भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सीन लसीचा डोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्य़ामुळे त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोना महामारीला अटोक्यात आणण्यासाठी डिसीजीआय़ने सीरम इन्स्टिट्यूटद्वारा बनवण्यात आलेल्या कोवीशील्ड आणि भारत बायोटेकेने बनवलेल्या कोव्हॅक्सीन लसींना मान्य़ता दिली.आपात्कालिन स्थीतीत या दोन लसींना डीसीजीआयद्वारा मान्यता देण्यात आली होती. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना तसेच 45 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना सरकारी रुग्णालयात मोफत लस देण्यात येणार आहे.   

 

संबंधित बातम्या