कोव्हॅक्सिन तिसऱ्या टप्प्यात

गोमंतक वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

भारत बायोटेकने कोरोनाला रोखण्यासाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या  लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना  अखेर परवानगी मिळाली आहे.

नवी दिल्ली :  भारत बायोटेकने कोरोनाला रोखण्यासाठी तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या  लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना  अखेर परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब व आसाममधील सुमारे २५ हजार लोकांना २८ दिवस चालणाऱ्या या चाचण्यांमध्ये सहभागी करून घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

 दरम्यान कोरोनाच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीला ठोस असा शास्त्रीय आधार नसल्याचा  पुनरुच्चार आरोग्य यंत्रणेने केला आहे. प्लाझ्माचे दुष्परिणाम समोर आले तर त्यावर देखील बंदी घालू असा इशारा आयसीएमआरने दिला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांनी प्लाझ्मा उपचारांची संख्या वाढविली आहे. दिल्लीत तर देशातील पहिली प्लाझ्मा बॅंकही सुरू करण्यात आली आहे. 

कोव्हॅक्सिनच्या पुढील चाचण्यांना ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) काल परवानगी दिली होती. पुढील महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या या चाचण्या सुरू करण्याचा भारत बायोटेकचा विचार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अतिशय किचकट असतात व त्यांचे परिणाम दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात.

संबंधित बातम्या