Covid-19 in children: लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल? पालकांनी काय करावे

Covid-19 in children How do you identify corona symptoms in children What parents should do
Covid-19 in children How do you identify corona symptoms in children What parents should do

कोविड -19(Health Ministry) प्रतिबंधांत्मक लसीचे(vaccine) डोस मिळविण्यासाठी प्रौढ आणि वृद्धांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली आहे. संपूर्ण आरोग्या यत्रणा हे लसीकरणाचं (Vaccination)काम उत्तम पद्धतीने पार पाडतांना दिसत आहे. राज्यांत सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता प्रौढ नागरीकांसोबतच लहान मुलांकडे ही लसीकरणासाठी लक्ष केंद्रीत केले जात आहे. कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत लहान मुलांना(Children) कोरोना होण्याची जास्त शक्यता  वर्तविली जात आहे. त्यामुळे आता केंद्रांची आणि राज्याची चिंता आणखी वाढली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Family Welfare)मुलांमधील कोविड-19 ची लक्षणे कशी ओळखावी याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची सूची जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "कोविड -19 चा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे असू शकतात.(Covid-19 in children How do you identify corona symptoms in children What parents should do)

एसीम्प्टोमॅटिक म्हणजे काय?
रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग असल्याने कोरोनाची लक्षण लहान मुलांमध्ये दिसत नाही. मात्र लक्षण दिसत नाही म्हमणजे त्याला कोरोना झाला नाही असं होत नाही. ही सौम्य लक्षणं एख्याद्या व्यक्तीमध्ये जवळजवळ 14 दिवस टिकून राहू शकते. बर्‍याच लोकांची प्रकृती विषाणूच्या संक्रमण होण्यामुळे आणखी गंभीर होवू शकते. त्याचप्रमाणे, याआधी कोरोनाची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती. जसं की, खोकला, ताप, किंवा श्वास घेण्यात अडचण हे अनुभव लोकांनी घेतले आहे. मात्र कोरनाच्या तिसऱ्या लाटेचता विचार केला तर कोरना टेस्ट चा रिपोर्य सकारात्मक आल्यानंतरही सुरूवातला त्याची कोणतीही लक्षणे रूग्णांमध्ये दिसत नाहीत. मुलांमध्ये सामान्य लक्षणांमधे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे, थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, शरीरात वेदना होणे, नाकातून जाड द्रवपदार्थ बाहेर पडणे, अतिसार, वास न येणे  चव न लागणे. असे नवे लक्षणं मुलांमध्ये दिसू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

एसीम्प्टोमॅटिक मुलांचे व्यवस्थापन

एसीम्प्टोमॅटिक कोविड-19 पॉझिटिव्ह असणाऱ्या मुलांना घरी विलगिकरणात ठेवले जावू शकते. मंत्रालयाने म्हटले आहे की, "कुटुंबातील सदस्यांना मुलांमध्ये कोविड पॉझिटिव्ह ची लक्षणं आढळल्यास त्वरीत मुलांची तपासणी केरून घ्यावी.अशा मुलांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर लगेचच उपचारांसाठी आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, मध्यम आजार असलेल्या मुलांमध्ये घसा दुखणे, खोकला किंवा श्वासोच्छवासाचा थोडा त्रास असू शकतो त्यासाठी कोरोना तपासणीची आवश्यकता नसते." आरोग्य मंत्रालयाने अशी शिफारस केली आहे की, अशा मुलांची देखभाल घराच विलगिकरण कक्षात करावी." मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये मुलांना हृदयविकाराचा त्रास असल्याच, फुफ्फुसाचा आजार असल्यास, मुले अपंग असल्यास घरीच ठेवण्याची आणि घरीच उपचार घेण्याची शिफारस केली आहे.

मुलांसाठी लसीकरण
भारतातील लसीच्या तुटवड्या दरम्यान, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला 2 ते 12 वयोगटातील मुलांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलचे देशभर स्वागत होत आहे. तज्ञांचा असा विश्‍वास आहे की लसीची बालरोगविषयक श्रेणी लवकरच बाजारात उपलब्ध होईल. भारत बायोटेक क्लिनिकल चाचणीमध्ये 18 वर्षांखालील 525 निरोगी स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. कोवॅक्सिनव्यतिरिक्त, झाइडस कॅडिलाच्या 'झायकोव्ही-डी'ची अमेरिकेत 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात आली. या सरकारने आधीच फायजरला मुलांच्या लसीकरणासाठी अधिकृत परवानगी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com