देशातील ६६ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

जगाच्या आर्थिक नाड्या आवळणाऱ्या कोरोनाने अनेकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असून यंदा मे ते ऑगस्ट या काळामध्ये तब्बल ६६ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत

नवी दिल्ली: जगाच्या आर्थिक नाड्या आवळणाऱ्या कोरोनाने अनेकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असून यंदा मे ते ऑगस्ट या काळामध्ये तब्बल ६६ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, यामध्ये डॉक्टर, अभियंते आणि शिक्षक यांचा समावेश आहे. रोजगारामध्ये झालेली ही २०१६ नंतरची निचांकी घसरण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मागील चार ते पाच वर्षांमध्ये लाखो औद्योगिक कामगारांनी मेहनत करून मिळवलेले यश कोरोनामुळे मातीमोल झाले आहे. ‘‘ दि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) ने सादर केलेल्या आकडेवारीतून ही बाब उघड झाली आहे. ‘सीएमआयई’कडून दर चार महिन्याला रोजगाराची स्थिती मांडणारा अहवाल सादर करण्यात येतो. 

यांना बसला फटका
सॉफ्टवेअर अभियंते, डॉक्टर, शिक्षक, लेखापाल आणि विश्‍लेषक अशा स्वरूपाच्या पांढरपेशा नोकरदारांना याचा जबर फटका बसला आहे. एखादी विशिष्ट संस्था आणि संघटनेमध्ये काम करणारे आणि व्यावसायिक कौशल्य आत्मसात केलेल्या मंडळींना कोरोनाने मोठा धक्का बसला आहे.

तरुणाई नाराज का?

  •     कोरोनाच्या संकटात परीक्षा
  •     पंचविशीतील तरुणांना काम नाही
  •     तरुणाईच्या समस्यांवर ठोस उपाय नाही
  •     बड्या कंपन्यांनी केलेले कॉस्ट कटिंग
  •     औद्योगिक आणि आयटी क्षेत्राची घसरण

संबंधित बातम्या