Covid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर

Covid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर
Covid-19 Effect Corona affects people's jobs and occupations

नवी दिल्ली :  कोरोना (Corona) महामारीमुळे बहुतेक ग्राहकांचा असा विश्वास आहे की, पुढील 6 महिने आपले उत्पन्न (Income) कोरोना महामारीच्या आधीपेक्षा कमीच असेल. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून (Survey) ही माहिती समोर आली आहे, कोरोना महामारीपूर्वी ग्रहकांमध्ये चिंता होती. विशेषतः आर्थिकदृष्ट्या जे लोक सक्षम नाहीत त्यांच्या मनात याबाबत संशयाची परिस्थिती आहे. कोरोना महामारीमुळे त्यांच्या नोकरी ( Jobs)  आणि व्यवसायावर (Business) धोका निर्माण झाला आहे.

BCG कडून झालेल्या या सर्वेतून पहिल्या ते चौथ्या श्रेणीतील शहरे आणि ग्रामीण भागतील 4 हजार ग्राहकांशी चर्चा करण्यात आली. यातील 83 टक्के लोकांनी कोरोना महामारीमुळे त्यांच्या नोकरी आणि व्यवसायावर धोका निर्माण झाला आहे. 86 टक्के लोकांनी कोरोनामुळे आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 51 टक्के ग्राहकांचे म्हणणे आहे की, पुढील ६ महिन्यात त्यांचे खर्चाचे प्रमाण कमी राहिल. मागीलवर्षी 20 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेत असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण 40 टक्केच होते. पुढील 6 महिन्यात उत्पन्न कमी असेल असे मत 58 टक्के लोकांचे आहे.

शहरीभागात कोरोना महामारीमुळे लोकांच्या जीवनशैलीवर अधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांमध्ये  आर्थिक दृष्ट्या जास्त संशय निर्माण झाला आहे. BCG चे व्यवस्थापकीय संचालक निमिषा जैन म्हणाल्या, लोकांमध्ये नक्कीच संभ्रमावस्था दिसत आहे. परंतु यावेळी काही सकारात्मक गोष्टी देखील समोर आल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारातील लोकांमध्ये खर्चाची संकल्पना समान दिसून आली आहे. लोक घरात आवश्यक खर्च, मनोरंजन, आरोग्य आदीवर खर्च करताना दिसतील. तर अनावश्यक खर्चाला आळा घातला जाईल.       

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com