सांबरानी येथे ‘कोविड’-१९ ची जनजागृती

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि समाजोपयोगी कामे करतानाही खबरदारी घेतली पाहिजे.

हल्याळ

हल्याळ येथील येथील कॅनरा बँक आणि व्ही. आर.डी.एम ट्रस्ट, हल्याळ तालुका इस्पितळ  आणि सांबरानी इस्पितळ यांच्या वतीने तालुक्यातील सांबरानी ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य केंद्रात स्वसाहाय्य संघ सदस्यांना कोविड १९ विषयी जनजागृती करत माहिती देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सांबरानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. अनीलकुमार नाईक बोलताना म्हणाले ‘कोविड’-१९ विषाणूने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना आणि समाजोपयोगी कामे करतानाही खबरदारी घेतली पाहिजे.  कसलेही दुर्लक्ष करू नका आणि मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा आणि कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नका.
यावेळी व्यासपीठावर  सांबरानी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. कृतिका देसाई, सविता नाईक, मित्रा नाईक, ताजुद्दीन बळ्ळारी,  संस्थेचे उळवय्या भेंडीगिरी आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या