COVID-19: लसीकरणा मध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य देण्याची शिफारस

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 जून 2021

गर्भवती महिलांमध्ये(pregnant women) कोरोनामुळे(Covid-19) होणाऱ्या वाढता मृत्यू दर लक्षात घेता, नवीन अहवालानुसार त्यांना लसींकरणामध्ये(Vaccination) प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

दिल्ली: गर्भवती महिलांमध्ये(pregnant women) कोरोनामुळे(Covid-19) होणाऱ्या वाढता मृत्यू दर लक्षात घेता, नवीन अहवालानुसार त्यांना लसींकरणामध्ये(Vaccination) प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या अहवालानुसार, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मातांचा मृत्यूदर आधीच उच्च आहे. आणि कोविड 19 मुळे हा दर आणखी वाढू शकतो म्हणून आता गर्भवती महिलांना लसींकरणामध्ये प्राधान्य देण्याची शिफारस करण्यात आली.(COVID-19 Recommended to give preference to pregnant women in vaccination)

येडीयुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण 

कोरोना लसीचाही समावेश करा

दिल्लीच्या वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज सफजरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या अहवालानुसार गर्भवती महिलांच्या नियमित लसीकरणात कोरोना लसीचाही समावेश करावा. या पथकाच्या प्रमुख डॉ. यामिनी यांच्या म्हणण्यानुसार, विशेषत: गर्भवती महिलांना कोरोनाचा जास्त धोका असलेल्या भारतासारख्या देशांमध्ये हे पाऊल उचलले गेले पाहिजे. सध्या बहुतेक ठिकाणी लसीकरण या महिलांच्या इच्छेवर सोडले गेले आहे, तर गर्भवती महिलांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा जेणेकरून पोटात वाढणाऱ्या बाळालाही त्याचा लाभ होईल.

डेरा प्रमुख राम रहीमला कोरोनाची लागण 

पूर्वी चेतावणी दिली
अनेक संस्थांनी गर्भवती महिलांचा लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. दिल्ली बाल संरक्षण हक्क आयोगाने गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांच्या लसीकरणाला प्राधान्य मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता.  

मृत्यूचा 70 टक्के जास्त धोका
अहवालानुसार, गर्भवती महिलांमध्ये कोरोनामुळे मरणाऱ्यांचा धोका 70 टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. लसीकरण केल्याने आईसह बाळाचेही कोरोनापासून संरक्षण होईल, लसीकरणामुळे बर्‍याच गर्भवती महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या मुलामध्ये अॅन्टीबॉडीजची निर्माण झाले आहे. 

संबंधित बातम्या