कोविड-19 चाचण्यांनी प्रति दिन 2 लाखाचा टप्पा ओलांडला

Pib
गुरुवार, 25 जून 2020

कोविड-19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

मुंबई,

देशभरात चाचणी सुविधांच्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे गेल्या 24 तासांत 2 लाखाहून अधिक नमुने तपासण्यात आले जो आजवरचा उच्चांक आहे.

काल 2,15,195 नमुने तपासण्यात आले होते, त्यातील 1,71,587 नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यात आले तर खाजगी प्रयोगशाळेत 43,608 नमुने तपासले गेले.  आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 73,52,911 वर पोहोचली आहे.  यामुळे खाजगी प्रयोगशाळांनीही प्रति दिन सर्वाधिक नमुने तपासण्याचा उच्चांक नोंदवला आहे.

कोविड-19 चाचणी करण्यासाठी निदान प्रयोगशाळांच्या वाढत्या प्रमाणाचे द्योतक म्हणजे भारतात आता 1000 प्रयोगशाळा आहेत. यात शासकीय क्षेत्रात 730 आणि 270 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा:  557 (शासकीय: 359 + खाजगी: 198)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 363 (शासकीय: 343 + खाजगी: 20)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 80 (शासकीय: 28 + खाजगी: 52)

कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दरही दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,495 रुग्ण बरे झाले. आत्तापर्यंत एकूण 2,58,684 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 56.71% वर पोहोचला आहे. सध्या 1,83,022 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

कोविड-19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA.

कोविड-19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19@gov.in यावर तर इतर प्रश्न ncov2019@gov.in आणि @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड-19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. 

संबंधित बातम्या