"देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु होणार"

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

 "सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' आणि भारत बायोटेकने बनवलेल्या covaxin लसींना डीजीसीआयने मंजूरी दिली.मात्र लसीकरणासाठी मंजूरी दिली नव्हती. आता 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला प्रारंभ होणार आहे.

नवी दिल्ली : "सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' आणि भारत बायोटेकने बनवलेल्या covaxin लसींना डीजीसीआयने मंजूरी दिली.मात्र लसीकरणासाठी मंजूरी दिली नव्हती. आता 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीमेला प्रारंभ होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या कार्यक्रमांतर्गत लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होणार आहे.यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनाविरोधी आघाडीवर लढणाऱ्या तब्बल 3 कोटी कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी एका उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाच्या सध्यस्थितीचा आढावा घेतला,तसेच राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लसीकरणाच्या मोहीमेची तारीख निश्चित करण्यात आली.पुढच्या आठवड्यात येणाऱ्या मकर संक्रात,लोहरी,पोंगल,माग बिहू या सणांच्या मुहुर्तावर लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होणार आहे.त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी हा लसीकरणाचा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा आसल्याचे नमूद केले.सगळ्यात आगोदर आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाविरोधात आघाडीवर लढणाऱ्या कर्मरचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.त्यानंतर 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती ;तसेच 50 वर्षाखालील बहुव्याधी असणाऱ्या व्यक्तीनां लसीकरणात प्राधान्य मिळणार आहे.त्यांची एकूण संख्या सुमारे 27 कोटी असल्याचे सरकारी निवेदनात नमूद आहे.'कोवीशिल्ड' आणि covaxin या लसी सुरक्षीत आणि परिणामकारक असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या