अखेर तो क्षण आलाच; देशभरात लसीकरणास प्रारंभ

Covid 19 vaccination Prime Minister Narendra Modi will launch the Covid 19 vaccination campaign across the country through video conferencing
Covid 19 vaccination Prime Minister Narendra Modi will launch the Covid 19 vaccination campaign across the country through video conferencing

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने  गेल्या वर्शभरापासून थैमान घआतले आहे. पण या कोरोना विरूद्धच्या लढ्यात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. पंतप्रधान मोदी आज भारतात जगातील सर्वात मोठा कोविड -19लसीकरण कार्यक्रम सुरू करणार आहेत.

सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 सत्र साइटवर सुरू होईल, सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे.  प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांना लसी दिली जाईल. 

कोरोना योध्यांना आधी लस मिळणार असून पंतप्रधान मोदी लसिकरणानंतर काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस) कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्यसेवा कामगारांना ही लस मिळणार आहे.

यावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
त्याबरोबरच  राज्यातील लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी ११.३० वाजता मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात होणार आहे. मुंबईमधील एकूण 9 केंद्रांवरील 40 बूथवर हे लसीकरण केले जाणार आहे.

केंद्र सरकारने राज्यांना पाठवलेल्या नियमावलीनुसार लसीकरण होणार आहे.या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या  आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com