कोविडमुळे मुलांमध्ये मानसिक समस्या वाढल्या; युनिसेफ इंडियाचा धक्कादायक खुलासा

जागतिक स्तरावर दर 7 मुलांपैकी एका मुलाला मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून कोविड काळात (Covid19) याचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे.
कोविडमुळे मुलांमध्ये मानसिक समस्या वाढल्या; युनिसेफ इंडियाचा धक्कादायक खुलासा
Covid19Dainik Gomantak

जगभरात कोरोनाचा धोका (Covid19) अजूनही कमी झालेला नसताना दुसरीकडे कोवीडमुळे मुलांमध्ये मानसिक समस्या वाढू लागल्या असल्याचे दिसून येत आहे. याच पाश्वभूमीवर युनिसेफ इंडियाने (UNICEF India) आपल्या अहवालातून स्पष्ट केले आहे की, जागतिक स्तरावर दर 7 मुलांपैकी एका मुलाला मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून कोविड काळात याचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. युनिसेफ इंडियाच्या प्रतिनिधी डॉ.यास्मिन अली हक (Dr. Yasmin Ali Haque) म्हणाल्या, 'आम्ही पाहिले आहे की, मानसिक समस्या असूनही मुले याबद्दल बोलण्यास स्पष्टपणे तयार नाहीत.' ते पुढे म्हणाल्या, 'आम्हाला मुलांची गरज आहे, उदासीनता आणि वाईट विचारावर मात करुन आम्ही त्यांना मदत करु शकू. तसेच हा मानसिक कलंक दूर करणे हा एक मोठा प्रश्न आहे.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडने 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन' (United Nations Children’s Fund) नावाच्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे मुले, युवक, पालक आणि काळजी घेणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु कोरोना काळात मानसिक आरोग्याविषयी फारच कमी माहिती मिळत आहे. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, अनेक मुले दुःखामुळे चिंताग्रस्त आहेत. काही लोक विचार करत आहेत की, हे जग कुठे चालले आहे आणि यामध्ये त्यांचे नेमके स्थान काय? वास्तविक, लहान बालके आणि तरुणांसाठी हा एक अतिशय आव्हानात्मक काळ आहे.

Covid19
COVID19: केरळमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत होऊ शकते कोरोनाची स्थिती स्थिर

कोरोनाच्या आधीही मुलांना मानसिक समस्या भेडसावत होत्या

युनिसेफचे कार्यकारी संचालक हेन्रीएटा फोर म्हणाले, “देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) आणि निर्बंधांमुळे मुलांनी त्यांच्या आयुष्यातील मागील दोन वर्षे कुटुंब, मित्र, वर्गखोल्या आणि खेळाच्या मैदानापासून दूर घालवली आहेत. फोर पुढे म्हणाले, कोरोनाचा प्रभाव लक्षणीय आहे. कोरोना महामारीच्यापूर्वी अनेक मुले मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होते. विशेष म्हणजे आपल्या महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारांकडून खूप कमी गुंतवणूक केली आहे. लक्षणीय म्हणजे कोरोना काळात मानसिक समस्यांमध्ये वाढच झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com