हल्याळ येथे काेविड-19 संदर्भात जनजागृती

Dainik Gomantak
गुरुवार, 18 जून 2020

सरकारच्या सूचनांचे पालन करून काेविड-19 या महामारी राेगाला नियंत्रणात आणण्यासाठी आपण काळजी घ्यावी.

हल्याळ

काेविड-19 या संसर्ग विषाणूने जगात थैमान मांडल्याने या महामारी राेगाला नियंत्रण आणण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करावी असे आवाहन कारवारचे जिल्हाधिकारी डाँ.हरीश कुमार यांनी केले. हल्याळ तालुक्यातील हवगी येथील प्रथम दर्जा महाविद्यालय सभाभवन आयाेजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात तालुक्यातील पीडीओ आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कर्मचारी आणि तालुका प्रशासनातील कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.

ते  म्हणाले, सरकारच्या सूचनांचे पालन करून काेविड-19 या महामारी राेगाला नियंत्रणात आणण्यासाठी आपण काळजी घ्यावी. अधिकार आहे म्हणुन अन्याय करू नका. आम्ही आज रूग्णाबराेबर झगडता कामा नये. रोगासोबत झगडले पाहिजे. माणूस म्हणूनच आम्ही रुग्णाकडे पाहिले पाहिजे. काेविड-19 संसर्गजण विषाणूने दुस-या टप्या गाठला आहे. आराेग्य कर्मचारी सर्वे करायला येतात तेव्हा घरात घरात आले तर चुकीची माहीती देऊ नका. समाजात चांगल काम हाेण्यासाठी खरी माहीती द्या.

व्यासपीठावर हल्याळ तालुक्याचे मामलेदार विद्दादर गुळगुळी, दांडेली मामलेदार शलैश परमानंद, तालुका पंचायत अधिकारी प्रवीणकुमार साली, सी पी.आय बी.एस.लाेकापुर, सी.डी.पी.ओ. लश्मीदेवी, तालुका आराेग्यधिकारी रमेश कदम,नगरपालीका अधिकारी केशव चाैगुले, ड्रीगरी काँलेजचे प्रिन्सिपल डाँ.चंद्रशेखर लमाणी हाेते.

 

संबंधित बातम्या