Covid19:लहान मुलांची कशी काळजी घ्यायला हवी; आयुष मंत्रालयाच्या नवीन गाईडलाईन्स

Covid19:लहान मुलांची कशी काळजी घ्यायला हवी; आयुष मंत्रालयाच्या नवीन गाईडलाईन्स
covid-19.jpg

लहान मुलांमध्ये कोरोनाचा (covid-19) धोका वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (third wave) लहान मुलांना व तरुण पिढीला अधिक धोका असल्याचे म्हटले जात होते. मात्र, तिसरी लाट येण्याआधी लहान मुलांना कोरोना संसर्ग होताना दिसत आहे. या काळात लहान मुलांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आयुष मंत्रालयाने (ayush-Ministry) होमकेअर मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आयुष मंत्रालयाने ट्विट करून लहान मुलांसाठीची गाईडलाईन दिल्या आहेत. मंत्रालयाने आपल्या मार्गनिर्देशनात आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार वापरण्याच्या संदर्भात तसेच मास्क (mask)  परिधान करणे, योगासने करणे,(yoga) रोगाच्या पाच लक्षणांची ओळख पटविणे, डॉक्टरांच्या संपर्कात राहणे, असे आयुष मंत्रालयाने सल्ले देण्यात आले आहे. (Covid19  How to take care of young children New guidelines of the Ministry of ayush)

मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना साथीच्या लढाईत आयुर्वेदिक (Ayurvedic) उपचार प्रतिबंधात्मक औषध प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये लठ्ठपणा, शुगर टाईप-1, क्रोनिक कॉर्डियोपल्मोनरी किंवा कमी रोगप्रतिकारशक्ती (Immunity) असलेल्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त असू शकतो. परंतु विषाणूचे नवीन स्ट्रेन (New strain) उद्भवत असताना कोविड -19 च्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक झाले आहे. प्रौढांपेक्षा मुलांची काळजी घेणे अधिक आव्हानात्मक आहे. कारण लहान मुलांमध्ये मानसिक रोगप्रतिकारशक्ती, इम्यूनोलॉजी आणि फिजियोलॉजीमध्ये विभिन्नता आढळून येते. 

या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की मुलांनी आपले हात वारंवार धुवावेत आणि बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. जर मुले हात धुत नसतील, तर पालकाने त्यांना प्रेमाने समजावे. आयुष मंत्रालयाने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मास्क अनिवार्य आहे, तर 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांनी इच्छित असल्यास केवळ मास्क घालावे आणि जर ते परिधान केले असेल तर पालकांनी त्यांच्यावर लक्ष घ्यावे. नॉन-मेडिकल किंवा थ्री-लेयर कॉटन कपड्यांचा मास्क मुलांसाठी अधिक चांगला आहे.  गाईडलाईननुसार मुलांनी शक्यतो घरी राहावे आणि प्रवास करणे टाळावे. 

मंत्रालयाने असे म्हटले आहे की, एखाद्या मुलामध्ये कोविड संसर्गाची शंका असल्यास त्यांना घरातील प्रौढांपासून दूर ठेवा, कारण ते गंभीर आजारांचे बळी होऊ शकतात. मुलांमध्ये पाच विशिष्ट लक्षणे ओळखण्यास व त्यांचे निरीक्षण करण्यास कुटुंबांना सांगितले गेले आहे. यापैकी प्रथम, जर मुलास चार-पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असेल किंवा बाळाला जेवण न जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे , ऑक्सिजनची पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी होणे आणि मुलाला सुस्त वाटणे, मुलांमध्ये यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मत घ्या.

मुलांची काळजी कशी घ्यावी

मुलांना पिण्यास कोमट पाणी द्यावे

दोन वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांनी सकाळी आणि रात्री ब्रश करावा. 

पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनची  तेलाने मालिश करावी, कोमट पाण्याने गुळण्या करून घ्याव्यात  नाकात तेल घालणे, प्राणायाम, ध्यान आणि इतर शारीरिक व्यायाम देखील करणे

हळदीचे दूध, च्यवनप्राश आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींचे डेकोक्शन देऊन मुलांची प्रतिकारशक्ती बळकट करावी

कोविड संसर्गाची लक्षणे असलेल्या मुलांना केवळ आयुर्वेदिक औषधातील तज्ञांच्या देखरेखीखाली औषध द्यावे

मुलांनी पुरेशी झोप  घ्यावी आणि सहज पचण्याजोगे ताजे आणि संतुलित भोजन खावे

रोज संध्याकाळी मुलांच्या खेळाच्या ठिकाणी, खाट, बेड्स, कपडे आणि खेळण्यांवर जंतुनाशक फवारणी करणे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com