अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या कोरोनायोध्याच्या संरक्षणाचे विधेयक राज्यसभेत मंजूर

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीत जीव धोक्‍यात घालून गेले सहा महिने अहोरात्र रुग्णसेवा करणारे डॉक्‍टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणाऱ्या महामारी (दुरुस्ती) २०२० या विधेयकाला राज्यसभेने आज मंजुरी दिली.

कोरोना महामारीत जीव धोक्‍यात घालून गेले सहा महिने अहोरात्र रुग्णसेवा करणारे डॉक्‍टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणाऱ्या महामारी (दुरुस्ती) २०२० या विधेयकाला राज्यसभेने आज मंजुरी दिली. या कायद्याचा परीघ पोलिस व ‘आशा’ कर्मचाऱ्यांपर्यंत वाढवावा आणि कोरोना योद्ध्यांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) खटले चालवून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी वक्‍त्यांनी केली. मात्र मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्ध्यांची नेमकी संख्या किती, या प्रश्‍नाला सरकारकडून उत्तर मिळाले नाही. 

केवळ महामारी काळातच नव्हे तर अन्य वेळेतही सरकारी व खासगी डॉक्‍टरांवरही हल्ले करणारांवर कारवाईची तरतूद या विधेयकात करावी, असे राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनी सांगितले. ‘आशा’ कर्मचाऱ्यांनाही या कायद्याच्या परिघात आणावे अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेने विधेयकाला पाठिंबा देताना कोरोना योद्ध्यांच्या वेतनवाढीची सूचना केली. खासगी रुग्णालयांच्या लूटमारीला पायबंद घालावा अशी मागणी बसपचे वीरसिंह आदींनी केली. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की डॉक्‍टरांना वेतन देण्यासाठी राज्यांना निधी दिला आहे. पीपीई कीट व अन्य उपकरणे दिली असून अनेक राज्यांनी हे साहित्य ठेवण्यास जागा नसल्याचे कळविले आहे.  

कोरोनाची स्थिती: 
५३,०८,०१५ कोरोनाबाधितांची संख्या
८५,६१९ एकूण मृत्युमुखी पडलेले
६,२४,५४,२५४ एकूण चाचण्या
 

संबंधित बातम्या