तीनशे पेक्षा जास्त कोरोना बाधितांबवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

त्यांना हुतात्म्याचा दर्जा देऊन त्यांच्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

देशात सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी लाट (COVID19 Second Wave) सुरु असून, या लाटेमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू (Deaths) होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज देशात कोरोना संक्रमित रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने स्मशान आणि कब्रस्तानबाहेर रांगा लागत असल्याचे भयावह चित्र सध्या पाहायला मिळते आहे. या परिस्थितीमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि इतरच सर्वच आपत्कालीन सेवा देणारे कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत असल्याचे पाहायला मिळते आहे. अशातच हरियाणामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एका योध्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (COVID19 warrior dies due to COVID19 in Haryana)

हरियाणाच्या (Haryana) हिसार नगरमधील नगरपालिकेचे कर्मचारी संघाचे प्रमुख प्रवीण कुमार हे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत होते. त्यांनी आज पर्यंत 300 पेक्षा जास्त कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले होते. सोमवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले आहेत. 

Cyclone Tauktae: वादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या 34 जणांचा मृत्यू

आज पर्यंत प्रवीण यांनी कोरोना योद्धाम्हणून मोठे काम केले असलत्याने त्यांच्या कार्याचा आदर म्हणून नगर पालिकेतील एखाद्या वस्तूला त्यांचे नाव द्यावे, तसेच त्यांना हुतात्म्याचा दर्जा देऊन त्यांच्या परिवारातील सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. 
 

संबंधित बातम्या