Covishield Vaccine: अदर पुनावालांची मोठी घोषणा; लसीची किमंत 100 रुपयांनी केली कमी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

यापूर्वी कोवीशिल्ड (Covishield) लसीची किंमत 400 रुपये होती. आती ती 300 रुपयांना मिळणार आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सीरमने आपल्या कोवीशिल्ड लसीची किंमत आता 100 रुपयांनी केली आहे. यापूर्वी कोवीशिल्ड (Covishield) लसीची किंमत 400 रुपये होती. आती ती 300 रुपयांना मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ही माहिती दिली आहे. (Covishield Vaccine Big announcement of other reunions The price of vaccine has been reduced by Rs 100)

सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute Of India) काही दिवसांपूर्वीच कोवीशिल्ड लसीचे नवे दर जाहीर केले होते. यानुसार राज्यांसाठी 400 रुपये प्रति डोस अशी किंमत असून खासगी रुग्णालयांसाठी हीच लस 600 रुपयांना असणार अशी माहिती देण्यात आली होती. आता सिरमने कोवीशिल्डचे नवे दर जाहीर केले असून नव्या दरानुसार राज्य सरकारांना ही लस 300 रुपायांना मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांना या लसीसाठी पूर्वी होती इतकीच किमंत 600 रुपयेच असणार आहे.

Coronavirus: भारतने केली टोसिलिजुमैब औषधाजी आयात; महाराष्ट्राच्या वाट्याला...

दरम्यान, देशभरात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र देशात अनेक ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. 

संबंधित बातम्या