ESIC Covid-19 Relief Scheme: कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबाला दरमहा मिळणार 1800 रुपये पेन्शन

ESIC Covid-19 Relief Scheme
ESIC Covid-19 Relief Scheme

नवी दिल्ली: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ईएसआयसीने(ESIC)  कोविड -19 मदत(Covid-19 Relief Scheme) योजनेस नुकतीच मंजुरी दिली होती. ईएसआयसी कार्डधारकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जर ईएसआयसीच्या अखत्यारीतील विमाधारकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला तर त्याच्या आश्रित व्यक्तींना ईएसआयसीकडून किमान 1800 रुपये दरमहा पेन्शन मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार आता कामगार मंत्रालयाने(Labour Ministry) कोविड-19 मदत योजनेस अधिसूचित केले आहे.(COVUD-19 relief scheme Centre announces Rs 1800 per month for bereaved families)

ईएसआयसी कोविड-19 मदत योजनेतून होणारे फायदे
ईएसआयसीचे महसूल आणि लाभ विमा आयुक्त एमके शर्मा यांचे म्हणणे आहे की, या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या कुटूंबाला मृत कर्मचाऱ्यांचा पगार मिळेल. म्हणजेच, जर ईएसआयसीमध्ये योगदान देणारी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली तर त्याची पत्नी, मुले, पालक किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना दरमहा मृत कर्मचार्‍याच्या शेवटच्या पगाराच्या 90 टक्के रक्कम दिली जाईल.

योजनेचा लाभ घेण्यास ही व्यक्ती असणार पात्र
या योजनेच्या पात्रतेमध्ये बरीच सवलत देण्यात आली आहे.  कोणत्याही कंपनीत एका वर्षात त्या व्यक्तीने किमान 70 ईएसआयसीमध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्ंयाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्यास या योजनेचा लाभ त्याच्या कुटुंबाला मिळेल. या व्यतिरिक्त, कर्मचारी कोविडची लागण होण्यापूर्वी तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही कंपनीचा कर्मचारी असणे आवश्यक आहे. या दरम्यान, जर त्याला कोरोनाची लागण झाली असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचे कुटुंब या योजनेस पात्र ठरणार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com