एका कलाकाराने न वापरलेल्या टॉयलेटचे केले आर्ट गॅलरीत रूपांतर

दैनिक गोमन्तक
शनिवार, 26 डिसेंबर 2020

एक असामान्य पुढाकाराने, काही वर्षांपूर्वी न वापरलेली शौचालय इमारतचं द गॅलरी वन टू नावाच्या आर्ट गॅलरीत रूपांतरित झाली.

उटी : एक असामान्य पुढाकाराने, काही वर्षांपूर्वी न वापरलेली शौचालय इमारतचं द गॅलरी वन टू नावाच्या आर्ट गॅलरीत रूपांतरित झाली. तामिळनाडूमधील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या उटीमध्ये सध्या एका कलाकाराने वापरात नसलेल्या सार्वजनिक शौचालयात (टॉयलेट) पुढाकार घेऊन या ठिकाणी आर्ट गॅलरी सुरु केली आणि या कलाकारांच्या प्रयत्नांना यश आलं. एक कलाकार काय करु शकतो याचं उत्तम उदाहरण या आर्ट गॅलरीमुळे पुढं आलं आहे.  

अलीकडे, आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर एक क्लिप सोशल मिडियावर शेअर करून या आर्ट गॅलरीचे कौतूक केले आहे. “नगरपालिकेने येथून जवळच नवीन सार्वजनिक शौचालक उभारलं असल्याने या इमारतीमध्ये आर्ट गॅलरी सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली, “या आर्ट गॅलरीचे नाव द गॅलरी वन टू असं ठेवण्यात आलं आहे.” असं साहू यांनी व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर, तुम्हाला विश्वास बसणार नाही की, एकेकाळी  हे ठिकाण एक शौचालय परिसर होते.

व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या आर्ट गॅलरीमध्ये एक छोट्या ग्रंथालयाचीही झलकदिसून येते. हे ग्रंथालय स्थानिकांना मोफत सेवा देणार असून येथे बसून स्थानिकांना निवांतपणे पुस्तकं वाचता येणार आहेत.  आर. मणिवन्नम या कलाकाराने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणलीय. या आर्ट गॅलरीत मणिवन्नम यांचीही काही चित्र लावण्यात आली आहेत. आर. मणिवन्नम असं कलाकाराच नाव असून या कलाकाराच्या पुढाकाराने ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या आर्ट गॅलरीत मणिवन्नम यांची चित्र लावण्यात आली आहेत.

स्थानिक  लोक या आर्ट गॅलरीला चांगलाच प्रतिसाद देताना दिसून येत आहे. तेव्हा एका शौचालयाच्या इमारतीपासून ते थेट आर्ट गॅलरीपर्यंतचा या इमारतीचा प्रवास सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. लोकांनी या न वापरलेल्या जागेचा उपयोग करण्याच्या विलक्षण प्रयत्नांचे कौतुक केले आहे. आणि या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल लोकांनी साहूंचे अभिनंदनही केले आहे.

 

 

संबंधित बातम्या