सामूहिक अत्याचारला बळी पडली 'जीविका'..!

खून करून मृतदेह शेतात फेकून दिला
सामूहिक अत्याचारला बळी पडली 'जीविका'..!
Crime NewsDainik Gomantak

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जीविका सोबत गैरकृत्याची (Crime News) सध्या महाराष्ट्र भर (Maharashtra) चर्चा चालू असून संबंधित महिला घरातील इतर सदस्यांसोबत बाजारात खरेदीसाठी गेली होती. दरम्यान बिहार येथील औरंगाबादमध्ये जीविका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News
'या' शब्दांच्या पासवर्ड पासून सावधान रहा!

ही महिला फासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील रहिवासी असून, ती शुक्रवारी सून आणि मेहुणीसह बाजारात गेली होती आणि खरेदी केल्यानंतर सर्वजण घरी परतण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. दरम्यान, रेल्वेत एक तरुण आढळून आला, त्याची माहिती महिलेने कुटुंबीयांना दिली. यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा रफीगंजच्या गरवा गावातील शेतातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. रेल्वेतून उतरवून तरुणाने तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून मृतदेह शेतात फेकून दिल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी गारवा गावातून मृतदेह ताब्यात घेतला.

Crime News
इंदूर स्वच्छता सर्वेक्षणात सलग पाचव्यांदा आघाडीवर

एसआयटी स्थापन करून तपास करण्याची मागणी

येथे जीविका च्या सामूहिक बलात्कारानंतर हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राजद नेते आणि काही लोकांनी सदर हॉस्पिटलच्या मुख्य गेटजवळ मृतदेह ठेवून निदर्शने केली. राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी सांगितले की, आज जीविका ची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. शासनाने त्वरित कार्यवाही करावी. निदर्शनाची माहिती मिळताच एसडीएम विजयंत आणि एसडीपीओ गौतम शरण ओमी घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांना आश्वासन देऊन शांत केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com