''पहिल्या पेपरलेस बजेटमध्ये देशातील सर्व क्षेत्रांची विक्री करण्यात आली आहे''

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ममता बॅनर्जी यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा लोकविरोधी अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. 

Union Budget2021 : सेन्सेक्स तब्बल 2314 आणि निफ्टी 646 अंकांनी झेपावला  

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका करताना हे लोकविरोधी बजेट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय केंद्र सरकार नेहमीच खोटी विधाने करत असल्याचा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच भारताच्या इतिहासातील पहिला पेपरलेस अर्थसंकल्पात जवळपास देशातील सर्व क्षेत्रांची विक्री करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असंघटित क्षेत्रासाठी काहीही नसल्याचे ममताबॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

याव्यतिरिक्त, ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत माँ, माटी आणि माणूश म्हणजेच तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय भारतीय जनता पक्ष हा गॅसचा बलून असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

दरम्यान, यावर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार असून, या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे आमने-सामने आले आहेत.             

संबंधित बातम्या