''अन्नधान्याला तिजोरीत बंद करता येणार नाही'' 

दैनिक गोमन्तक
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून कितालना येथील संयुक्त किसान मोर्चाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी तिन्ही कायदे रद्द केल्याखेरीज माघार घेणार नसल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून कितालना येथील संयुक्त किसान मोर्चाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी तिन्ही कायदे रद्द केल्याखेरीज माघार घेणार नसल्याचे म्हटले आहे. राकेश टिकैत यांनी सभेत बोलताना शेतकऱ्यांमध्ये फूट पडू न देण्याबरोबरच, पिकांचा निर्णय शेतकरीच करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नवीन कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत घरी जाणार नसल्याची घोषणा पुन्हा राकेश टिकैत यांनी दिली आहे. 

दिलासादायक बातमी; देशातील कोरोनाचा विळखा होतोय कमी 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आज कितालना येथील संयुक्त किसान मोर्चाच्या सभेत बोलताना युवकांना संयमाने काम करण्याचे आव्हान केले. तसेच खाप सिस्टम मजबूत असून, याची आत्ता खोरोखर गरज असल्याचे राकेश टिकैत यांनी यावेळेस म्हटले आहे. त्यानंतर तरुण युवकांनी सध्याच्या घडीला वादग्रस्त कृषी कायदे घालवण्याची मागणी केलेली आहे. मात्र पुढे जाऊन युवकांनी सत्तेची मागणी केल्यास याला जनतेत बरेच समर्थन मिळण्याची शक्यता असल्याचा टोला राकेश टिकैत यांनी सरकारला लगावला आहे. याशिवाय, कृषी कायद्यावरून उद्योजकांवर टीका करताना, राकेश टिकैत यांनी अन्नधान्याला तिजोरीत बंद करता येणार नसल्याचे सांगितले. व सरकारने हे तिन्ही कायदे मागे घेऊन, एमएसपीवर आधारित कायदा करण्याची मागणी  राकेश टिकैत यांनी केली.   

तसेच, राकेश टिकैत यांनी पुन्हा तरुणांना आपला राग सोडून देण्यास सांगितले. आणि हात उंचावून याबाबतचा पाठिंबा त्यांनी युवकांकडून मागितला. एवढेच नाही तर, तरुणांना जमिनीशी नाळ जोडून घेण्याचे सांगत, त्यांनी कंपन्यांऐवजी शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, प्रजासत्ताक दिनादिवशी घडलेल्या घटनेसंदर्भात बोलताना, लाल किल्ल्यावर जे काही घडले ते फसवणुकीने झाले असल्याचे  राकेश टिकैत म्हणाले. व अशा घटना खपवून घेणार नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

दरम्यान, कितालना येथील संयुक्त किसान मोर्चाच्या जाहीर सभेला अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळेस शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल, मेहमचे अपक्ष आमदार बलराजसिंग कुंडू, दादरीचे अपक्ष आमदार सोमबीर सांगवान हे नेते उपस्थित होते. तर सभेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तर, शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा वेगाने वाढत असून, शनिवारी शेतकऱ्यांनी देशाच्या विविध भागात चक्का जाम आंदोलन केले होते.             

संबंधित बातम्या