मुस्लिम धर्मगुरूंच्या अंतयात्रेत झालेल्या गर्दीने कोरोना नियम पायदळी तुडवले

दैनिक गोमंतक
सोमवार, 10 मे 2021

कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) बदायु जिल्ह्यातील एका मुस्लिम धर्मगुरुचे (Muslim cleric) आज निधन झाले. धर्मगुरूंच्या अंतयात्रेत जमलेल्या लोकांनी केली आणि या गर्दीमध्ये कोरोना (corona) प्रतिबंध नियम पायदळी तुडवण्यात आले असल्याची घटना घडली आहे. तर या घटनेनंतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम धर्मगुरू हजरत अब्दुल हमीद मोहोम्मद सलीमुल कादरी यांचे काल निधन झाले आहे. (Crowds at the funeral of a Muslim cleric have violated Corona rules in UP) 

गंगेत फेकले जातायेत कोव्हिड मृतदेह?

धर्मगुरूंच्या निधनानंतर ही बातमी समजताच हजारो लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले. या घटनेत कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतयात्रेच्या व्हिडीओच्या माध्यमातुन आरोपींचा शोध घेतला जात असून, त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अंतयात्रेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओ मध्ये लोकांची मोठी गर्दी झाली असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मध्ये होणाऱ्या या घटनांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसून येते आहे.

संबंधित बातम्या