श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; सीआरपीएफ जवान शहीद 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 मार्च 2021

श्रीनगरमधील लावेपोरा भागात गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी रस्त्यावर गस्त घालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीनगरमधील लावेपोरा भागात गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी रस्त्यावर गस्त घालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सीआरपीएफचे प्रवक्ते ओपी तिवारी यांनी एका जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. तर जखमी तीन सैनिकांपैकी फक्त एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (A CRPF jawan has been killed in a terrorist attack in Srinagar)

या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. मात्र हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळे सर्व ठिकाणी तैनात केलेल्या सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि या दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. शिवाय, टीआरएफ या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या गस्तीवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

''भारताने मतदानाच्या वेळी तटस्थ राहून तमिळ लोकांच्या भावनांचा...

शहीद झालेल्या जवानाचे नाव एएसआय मंगा राम बर्मन असे आहे. आणि ते त्रिपुरा राज्यातील होते, अशी माहिती कळाली आहे. दरम्यान, 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफ (CRPF) जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला एका आत्मघातकी दहशतवाद्याने केला होता. आणि या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते.  

संबंधित बातम्या