CRPF Recruitment 2021: ग्रुप A अभियांत्रिकी पदांसाठी भरती

कमांडंट आणि डेप्युटी कमांडंटची एकूण 13 पदे भरली जाणार, 2 लाखांपर्यंत मिळणार पगार
CRPF Recruitment 2021: ग्रुप A अभियांत्रिकी पदांसाठी भरती
CRPF Recruitment 2021Dainik Gomantak

CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) अभियांत्रिकी संवर्गातील पदे भरण्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागात काम करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. कमांडंट आणि डेप्युटी कमांडंटची एकूण 13 पदे या भरतीअंतर्गत भरली जाणार आहेत. या संदर्भात सविस्तर अधिसूचना अधिकृत वेबसाईट crpf.gov.in वर जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेतील सर्व आवश्यक माहिती पाहून पात्र उमेदवार 24 सप्टेंबरपर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात.

CRPF Recruitment 2021
Goa Electricity Department Recruitment 2021: 243 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

रिक्त पदांचा तपशील

  • रिक्त पदांचा तपशील

  • कमांडंट - 02 पद

  • उप कमांडंट - 11 पदे

  • एकूण - 13 पदे

हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जासह आवश्यक प्रमाणपत्रासह उप महानिरीक्षक (कार्मिक), महासंचालनालय, सीआरपीएफ, सीजीओ कॉम्प्लेक्स, ब्लॉक क्रमांक 1, लोधी रोड, नवी दिल्ली- 110003 या पत्त्यावर पाठवावे. उमेदवारांची नेमणूक नियमानुसार तीन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल.

CRPF Recruitment 2021
Indian Army Recruitment: इंजिनीअर्ससाठी मोठी भरती, वेतन ही भरगच्च, असा करा अर्ज

अधिकृत अधिसूचनेनुसार, कमांडंट पदाला लेव्हल 13 अंतर्गत 1,23,100 ते 2,15,900 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल. त्याचबरोबर, उप कमांडंट पदासाठी लेव्हल 11 अंतर्गत 67,700 रुपयांपासून 2,08,700 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय कमाल 52 वर्षाच्या आत असावे. उमेदवारांनी इतर सर्व महत्वाच्या माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासून घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com