Cyber Crime: बॅंकेत बंद मोबाईल नंबर लिंक असल्याने बसला लाखोंचा गंडा

Cyber Crime: जर बॅंकेला जोडलेला नंबर खूप काळासाठी बंद असेल तर, असे प्रकार घडण्याचे प्रमाण जास्त आहे.
Cyber Crime
Cyber CrimeDainik Gomantak

Cyber Crime: आज डीजीटलच्या काळात सायबर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. बंद पडलेल्या सीमच्या माध्यमातून हा गुन्हा करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये एका व्यक्तीचे एक सीमकार्ड बऱ्याच दिवसांपासून बंद होते. मात्र, हे सीमकार्ड बॅंकेच्या खात्यासोबत जोडलेले होते. कंपनीने सीमकार्ड बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याने ते दुसऱ्या ग्राहकाला देऊन टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर पहिल्या व्यक्तीच्या खात्यातले लाखो रुपए गायब झाले आहेत. पोलिस( Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अलीकडे दोन सीम वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातून अनेकवेळा एकच सीमकार्ड सुरु राहते आणि एका सीमकार्डवरचे व्यवहार बंद होतात. जर बॅंकेला जोडलेला मोबाईल नंबर खूप काळासाठी बंद असेल तर, असे प्रकार घडण्याचे प्रमाण जास्त आहे.

Cyber Crime
Space: भारतानं पुन्हा करुन दाखवलं... पृथ्वी-2 चे यशस्वी परिक्षण

त्याचबरोबर, सीमकार्ड बंद करायचे असेल तर त्याआधी बॅंके(Bank)ला याबाबतची माहीती दिली पाहिजे. त्यामुळे याबाबतीत खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com