Cyclone Sitrang: बांगलादेशनंतर भारतालाही अलर्ट कायम, आसामसह या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

बांगलादेशात उद्ध्वस्त झाल्यानंतर आता भारतातही वादळाचे रौद्र स्वरूप
Cyclone Sitrang
Cyclone SitrangDainik Gomantak

चक्रीवादळ सितरंगने (Cyclone Sitrang) शेजारच्या बांगलादेशात धडक दिली आहे. या धोकादायक चक्रीवादळामुळे बांगलादेशात सुमारे 24 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे हजारो घरांची पडझड झाली. आता या चक्रीवादळाने भारतात (India) दार ठोठावले असून, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. आसाममधील 80 हून अधिक गावांना वादळ आणि पावसाचा फटका बसला आहे. हवामान खात्याने ईशान्येकडील चार राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, बचाव पथकांच्या तुकड्याही पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 

बांगलादेशात सीतारंगने आपला भयानक रंग दाखवत, समोर आलेले सर्व काही उद्ध्वस्त केले. येथील 10 हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, 6 हजार हेक्टरपेक्षा जास्त पिके नष्ट झाली, हजारो मासेमारी प्रकल्प उद्ध्वस्त झाले आणि 24 लोकांना आपला जीव गमवावा लागला. हे धोकादायक वादळ बंगालच्या उपसागरातून उठले आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर मुसळधार पाऊस आणि वादळाने सर्व काही उद्ध्वस्त केले. 

सध्या 20 हजारांहून अधिक बांगलादेशींना या वादळाचा धोका आहे. येथील दक्षिण आणि दक्षिण पश्चिम भागात सर्वात वाईट स्थिती आहे. बरगुना, नरेल, सिराजगंज आणि भोळ जिल्ह्यांत जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. 

  • भारतात काय धोका आहे?
    आता भारताबद्दल (India) बोलायचे झाले तर येथील काही राज्येही या विनाशकारी वादळाच्या तडाख्यात येऊ शकतात. विशेषत: पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये (Odisa) या वादळामुळे कहर होऊ शकतो. भारतात सीतारंगच्या दणक्यानंतर हवामान खात्याने आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. 

    आसाममध्ये मुसळधार पाऊस (Rain) आणि वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे, तर शेकडो लोकांना याचा फटका बसला आहे. याशिवाय बिहारमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पण मंगळवारी हवामान खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे वादळ सीतारंग किनाऱ्यावर धडकताना कमकुवत होईल, असे सांगण्यात आले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com