Cyclone Tauktae: गुजरातला धडकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

'तौक्ते' हे चक्रीवादळ गुजरातला धडकण्यापूर्वीच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याने जास्त  नुकसान झाले नाही.

एकीकडे कोरोना (COVID19) आणि दुसरीकडे 'तौक्ते' (Tauktae) चक्रीवादळ अशा दुहेरी संकटाचा देश सध्या सामना करत आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात थैमान घातल्यानंतर आता हे वादळ गुजरातच्या (Gujrat)  किनारपट्टीवर धडकले आहे. ताशी 190 किमी वेगाने वाहणाऱ्या या वादळामुळे गुजरातच्या किनारी भागात भूस्खलन (Landfall) झाले असून, मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडले तसेच घरांचेही  नुकसान झाले आहे. हे वादळ मागच्या दोन दशकांमध्ये आलेले सर्वात मोठे वादळ असल्याचे समजते आहे.  (Cyclone Tauktae has hit Gujarat)

गरीब मुलांसाठी वैद्यकीय सुविधांसह स्वतंत्र गृहनिर्माण केंद्रे स्थापन करा ;...

'तौक्ते' हे चक्रीवादळ गुजरातला धडकण्यापूर्वीच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याने जास्त  नुकसान झाले नाही. हे चक्रीवादळ जेव्हा गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले तेव्हा त्याचा वेग ताशी 185 किमी एवढा होता. गुजरातच्या 17 जिल्ह्यांवर या वादळाचा परिणाम  झाला असून भावनगर, गीर सोमनाथ आणि अमरेली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले  आहे. 

  
दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या (NDRF) 44 टीम तैनात करण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्ण असलेल्या तसेच 1400 पेक्षा जास्त रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता. गुजरात सरकारने सांगितले की केंद्राने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.  तसेच या परिस्थीला तोंड देण्यासाठी नौसेनेच्या आणि हवाईदलाच्या जवानांना देखील प्रशासनाच्या मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तरी हवामान खात्याकडून या वादळाची तीव्रता कमी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

 

संबंधित बातम्या