Cyclone Yaas: उंच लाटा, वादळी वारा, चक्रीवादळाचे रौद्र रूप व्हिडीओतून आले समोर

दैनिक गोमंतक
बुधवार, 26 मे 2021

पश्चिम-बंगाल आणि ओडिशा राजांच्या किनारी भागांमध्ये वादळाचे तीव्र स्वरुप पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

देशात कोरोना महामारीचे संकट असताना दुसऱ्या बाजूला देश मोठ-मोठ्या संकटांशी झुंजतो आहे. काही दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर (West Coast) तौक्ते वादळाने थैमान घातल्यानंतर आता पूर्व किनारपट्टीवर (East Coast) यास या चक्रीवादळाने (Cyclone Yaas) धडक दिली आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल (West Bengal) आणि ओडिशा (Odisha) राजांच्या किनारी भागांमध्ये वादळाचे तीव्र स्वरुप पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आज पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरच्या दिघा भागात समुद्राचे रौद्र रूप पाहायला मिळाले आहे. (Cyclone caused major changes in the atmosphere on the eastern coast)

वादळामुळे पश्चिम-बंगालच्या किनारी भागात वादळी वर आणि पाऊस सुरु झाला असून, समुद्राने देखील रौद्र रूप धारण केले आहे. यावेळी समुद्रात निर्माण झालेल्या मोठ-मोठ्या लाटांमुळे समुद्राचं पाणी भूभागावर आल्याचे दिसून आले आहे. 

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पीके जीना यांनी सांगितले की चक्रीवादळ यासच्या लँडफॉलची प्रक्रिया सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाली आणि सुमारे तीन-चार तास सुरू होती. दुपारी एक वाजेपर्यंत वादळ भूभागाच्या दिशेने जाईल असा अंदाज आहे. तसेच  धमरा ते बालासोर दरम्यान लँडफॉल बनवत असून आहे.   

CYCLONE YAAS: यास वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर
चक्रवाती वादळ 'यास' बालासोर (ओडिशा) च्या दक्षिण-दक्षिणपूर्व भागात केंद्रीत आहे. दुपारनंतर हे वादळ मयूरभंज जिल्ह्यात दाखल होईल. यावेळी, वाऱ्याचा वेग ताशी 120-130 किलोमीटर वेगाने वाहू शकतो असा अंदाज देखील पुढे त्यांनी वर्तवला आहे. 

यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये देखील हवामानात बदल दिसून येत असून जोरदार वर सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. 

संबंधित बातम्या