Cyclone Yaas: सावधान! पुन्हा एक चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

त्यानुसार देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी भागातील राज्यांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात (Arabian Sea) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तौक्ते हे वादळ निर्माण झाले होते. मागच्या काही दिवसांत हे वादळ (Cyclone) किनारपट्टीवर (Coast) धडकल्यानंतर देशाच्या अनेक राज्यांत मोठं नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एक वादळ भारताच्या किनारी भागांवर येऊन धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यानुसार देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टी (East Coast) भागातील राज्यांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. (Cyclone Yaas is expected to hit Indias east coast)

Tauktae Cyclone: पंतप्रधानांची गुजरातला 1000 कोटींची आर्थिक मदत

एकीकडे कोरोना संकटाशी लढत असताना दुसरीकडे महाकाय  चक्रीवादळ आल्यामुळे देश दुहेरी संकटाशी लढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तौक्ते या चक्रीवादलामुळे केरळ, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांत मोठे नुकसान झाले होते. तौक्ते वादळातून सावरतो न सावरतो तोच आता "यास" हे वादळ आता देशाच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. बंगालच्या सागरी भागांत होणाऱ्या वातावरण बदलामुळे यास हे चक्रीवादळ निर्माण होऊन ते पूर्व भागातील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात पूर्वेकडील किनारी भागांतील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छिमार आणि खलाशांना बोटी किनाऱ्यावर परत घेऊन येणास सांगितले जाते आहे.  कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्यास यास येणाऱ्या हे वादळ तीव्र स्वरूपात पाहायला मिळू शकतो.  येत्या 21 या  वादळाचे परिणाम पाहायला मिळू शकतात. या  पार्शवभूमीवर मासेमारांनी आणि  नागरिकांना सतर्कतेचा  आहे. 

संबंधित बातम्या