दांडी मार्च: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष गुजरातमधील अहमदाबादमध्ये साजरे करण्यास सुरुवात केली आहे.

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष गुजरातमधील अहमदाबादमध्ये साजरे करण्यास सुरुवात केली आहे. या उत्सवाच्या कार्यक्रमाला स्वातंत्र्याचे 'अमृत महोत्सव' नाव देण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त सात ठिकाणी डिजिटल प्रदर्शनांचे उद्घाटन करण्यात आले. अहमदाबादमधील मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याचवेळी पंतप्रधानांनी डिजिटल प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. त्यांनी 'अमृत महोत्सव वेबसाइट' देखील सुरु केली. अभय घाटावर महात्मा गांधींना नमन करत नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवाची सुरुवात केली. तसेच गुजरातमधील अन्य़ सहा ठिकाणी या अमृत महोत्सवाची सुरुवात झाली असून कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत आहे.
अहमदाबादमधील मुख्य स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ठिकाणी पंतप्रधानांनी भाषण देत आहेत.

भाजपने आदिवासींचा वापर राजकारणासाठी आणि मते मिळवण्यासाठी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ''आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा पहिला दिवस आहे. या अमृत महोत्सवाची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 च्या 75 आठवड्यापूर्वी सुरु झाली आहे आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव हा स्वातंत्र्य़ाच्या उर्जेचे अमृत महोत्सव असणार आहे. स्वातंत्र सैनिकांच्या बलिदानाचे अमृत महोत्सव. अमृत महोत्सव म्हणजे- नवीन कल्पनांचे अमृत. नवीन ठरावांचे अमृत. स्वातंत्र्याचे अमृत म्हणजे- स्वावलंबनाचे अमृत.

 

पंतप्रधान पुढे म्हणाले, ''जेव्हा एखाद्या देशाचा भूतकाळ त्य़ाच्या भूतकाळातील अनुभवांचा आणि वारशाच्या अभिमानाशी जोडलेला जातो त्यावेळी त्या देशाचे भविष्य उज्वल होते. भारताकडे अभिमान बाळगण्यासारखे भरपूर साठे आहेत. समृध्द इतिहासाबरोबर सांस्कृतिक वारसा आहे. मीठाच्या किंमतीला कधीही किंमत देण्यात आली नाही. इथे मीठ याचा अर्थ प्रामाणिकपणा होय. मीठ म्हणजे विश्वास, मीठ म्हणजे निष्ठा. आम्ही म्हणतो की, आम्ही देशाचे मीठ खाल्ले आहे. मीठ एक मौल्यवान वस्तू आहे. कारण मीठ हे श्रम आणि समानतेचे प्रतिक आहे.''

 

''1857 चा उठाव, परदेशातून महात्मा गांधीचा मायदेशाकडे येण्याचा प्रवास, लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यासाठीचे आवाहन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 'चलो दिल्लीची' घोषणा हे आपण कसं विसरु शकतो. स्वातंत्र्यची ज्योत उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम प्रत्येक भागामध्ये प्रत्येक जागी निरंतर जागृती करण्याचे काम संत, महंत,आचार्य यांनी केले. एक प्रकारे भक्ती चळवळीतून देशव्यापी चळवळीचे एक मोठे खंडपीठ स्थापन केले. श्यामजी कृष्णा वर्मा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात त्यांच्याच भूमीवर जाऊन त्यांच्या नाकावर टिचून भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. अनेक दशकांपासून काळाच्या पडद्याआड गेलेली डॉक्टर बाबासाहेबांची स्थाने पंचतीर्थाच्या नावाने देशाने विकसीत केली आहेत,'' असही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली. त्यासाठीची वेबसाइट देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच गुजरातमधीलच महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात जाऊन महात्मा गांधींना श्रध्दांजली वाहिली. तसेच अहमदाबादमधील अभय घाटावर पंतप्रधान मोदी यांनी चित्र प्रदर्शने, मासिके आणि इतर संग्रह पाहिले. अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून दांडी मार्चला पंतप्रधान रवाना करणार आहेत.     
 

संबंधित बातम्या