NCB ला मोठे यश! दाऊदचा ड्रग्स कारखाना चालवणाऱ्या दानिश ला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

राजस्थान पोलिस आणि एनसीबी यांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी रात्री गुंड दाऊद इब्राहिमची ड्रग्ज फॅक्टरी चालवणाऱ्या दानिश चिकनाला कोटा येथून अटक करण्यात आली आहे.

जयपूर: राजस्थान पोलिस आणि एनसीबी यांना मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी रात्री गुंड दाऊद इब्राहिमची ड्रग्ज फॅक्टरी चालवणाऱ्या दानिश चिकनाला कोटा येथून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॅनिश चिकना महाराष्ट्रातील डोंगरी येथे दाऊदच्या ड्रग्सचा कारखाना चालविते. राजस्थान पोलिस आणि एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईत गुरुवारी रात्री दानिशला अटक केरण्यात आली आहे. त्याचबरोबर डॅनिशच्या गाडीतूनही ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. दानिश चिकनाविरूद्ध खुनासह 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पैसा पाहून चोराला आला ह्रयविकाराचा झटका 

 

संबंधित बातम्या