कृषी कायदे रद्द करण्यासाठी राकेश टिकैतांनी दिली तारीख

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

देशभरात शेतकरी संघटनांनकडून  चक्का  जाम आंदोलन करण्यात आले. हे चक्का जाम आंदोलन 12  ते  3  या  वेळेत  पार  पडले.

नवी दिल्ली :  गेल्या  तीन  महिन्यांपासून कृषी  कायद्याच्या विरोधात  देशभरातील  शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आज देशभरात शेतकरी संघंटनाकडून  चक्का  जाम आंदोलन करण्यात आले. हे चक्का जाम आंदोलन 12  ते  3  या वेळेत पार  पडले. भारतीय किसान युनिय़नचे  अध्यक्ष  राकेश  टिकैत यांनी म्हटले की, ''केंद्र  सरकारला 2 ऑक्टोबर  पर्यंतचा वेळ  कृषी  कायदे  करण्यासाठी  दिला आहे. यानंतर  आम्ही  आंदोलनाची  पुढची  दिशा  ठरवू. आम्ही  कोणत्याही  दबावात  केंद्र सरकारबरोबर  चर्चा  करणार  नाही. सरकारने  कृषी  कायदे  रद्द  करुन  एमएसपी आधारीत  कायदे  बनवावेत  नाहीतर  आम्ही  हे  आंदोलन  सुरुच  ठेवणार  आहे.आम्ही शेतकरी  आंदोलन  देशभर  यात्रा  काढून  लोकांपर्यंत  पोहचवू. आणि   शेतकरी विरोेधी  कायदे  रद्द  करण्याची  मागणी  संपूर्ण  देशातून  होईल''.

Chakka Jam: शेतकऱ्यांसह दिल्ली पोलिसही चक्का जामसाठी सज्ज

दरम्यान  पोलिसांनी गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत  यांचा  मार्ग  आढवला  त्यावेळी त्यांनी पोलिसांसमोर  हात जोडून  जय  जवान  जय  किसानच्या घोषणा दिल्या. आणि आपण सर्वजन भाऊ आहोत असही  राकेश  टिकैत  म्हणाले. ''शेतकरी  आपल्या हक्कासाठी  कृषी  कायद्यांसाठी  आंदोलन  करत  आहेत. तर पोलिस आपले  कर्तव्य बजावत आहेत. आपण  आणि  ते सर्वजण भाऊ आहेत. शेतकऱ्यांच्या  मागण्या  तर  केंद्रातील  भाजप  सरकारकडे  आहेत. ज्यांनी  कृषी  कायदे  आणून  शेतकऱ्यांची  भाकरी  डब्यात  बंद  करण्याचा  प्रयत्न  केला आहे. आपले  हक्क  प्राप्त  केल्याशिवाय़  कोणत्याही  परिस्थितीत  दिल्लीच्या  सीमेवरुन  घरी परतणार  नाही.'' असं  भारतीय किसान युनियनचे  अध्यक्ष राकेश  टिकैत  यांनी  म्हटले. 

शेतकरी आंदोलनाला देशातून तसेच परदेशातून पाठिंबा मिळत आहे. केंद्र सरकार जोपर्य़त कायदे रद्द करत  नाही  तोपर्यत  आंदोलन  चालू  राहणार  असल्याचे शेतकरी  संघटनानकडून  सांंगण्यात  येत  आहे.

संबंधित बातम्या