कोविड रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालयीन व्यवस्थापन

pib
शनिवार, 27 जून 2020

हे औषध देखील आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा (एनएलईएम) एक भाग असून आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

नवी दिल्‍ली, 
कोविड-19 विषयी विकसित होत असलेल्या ज्ञानासह, विशेषतः प्रभावी औषधांविषयी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज कोविड-19 रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी अद्ययावत रुग्णालयीन व्यवस्थापन नियमावली जारी केली आहे. या सुधारित नियमावलीत मध्यम ते गंभीर रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी मेथ्यल्प्रेडनिसोलोन ला पर्याय म्हणून डेक्सामेथासोनचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अद्ययावत उपलब्ध पुरावे आणि तज्ज्ञांशी विचारविनिमय करून हा बदल करण्यात आला आहे.

डेक्सामेथासोन एक कॉर्टिकोस्टेरॉइड औषध आहे ज्याचा उपयोग त्याच्या दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकार शक्तीवरील (इम्युनोसप्रेसेंट) प्रभावांसाठी विस्तृतपणे केला जातो. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर या औषधाची बरे होण्याबाबतची रुग्णालयीन चाचणी घेण्यात आली. त्यात कोविड-19 च्या गंभीर रुग्णांना लाभ झाल्याचे आढळले. कृत्रिम श्वसन प्रणालीवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जवळजवळ एक तृतीयांश कमी झाल्याचे तर ऑक्सिजन उपचार पद्धतीवर असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जवळजवळ एक पंचमांश झाल्याचे निदर्शनास आले. हे औषध देखील आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा (एनएलईएम) एक भाग असून आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव, प्रीती सुदान यांनी अद्ययावत नियमावलीची उपलब्धता आणि तिच्या आचरणासाठी तसेच डेक्सामेथासोन औषधाच्या संस्थात्मक पातळीवरील वापरासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना अद्ययावत नियमावली पाठवली आहे. मार्गदर्शक दस्तऐवज आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहेत:

https://www.mohfw.gov.in/pdf/ClinicalManagementProtocolforCOVID19dated27062020.pdf

रुग्णालयीन व्यवस्थापन नियमावलीचे अंतिम अद्यतन 13 जून 2020 रोजी केले गेले. 

संबंधित बातम्या