Dawood Ibrahim: एनआयकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखाच बक्षीस जाहीर

Dawood Ibrahim News: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर NIA ने 25 लाखांचे बक्षीस ठेवले आहे.
Dawood Ibrahim Latest News
Dawood Ibrahim Latest NewsDainik Gomantak

डी-कंपनीवर मोठी कारवाई करत एनआयएने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे इनाम जाहीर केले आहे. दाऊदशिवाय (Dawood Ibrahim) एनआयएने छोटा शकीलवर (Chhota Shakeel) 20 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले आहे . खरं तर, एजन्सी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह टोळीच्या सदस्यांविरुद्ध नोंदवलेल्या अनेक गंभीर प्रकरणांमध्ये तपास करत आहे.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भारतात स्फोटके, शस्त्रे, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करण्यासाठी एक युनिट तयार करण्यात व्यस्त आहे. दाऊदच्या या कामात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि काही दहशतवादी संघटना मदत करत असल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी एनआयएने अनिस, चिकना आणि मेनन यांच्यावर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Dawood Ibrahim Latest News
'बैठिये ना','चलीये छोडिये'... नितीश कुमार अन् KCR यांच्या संभाषणाचा Video Viral

राजकीय नेत्यांसह काही व्यावसायिकही टार्गेटवर आहेत

दाऊदचा खरा उद्देश भारतात दहशतवादी कारवाया करणे हा आहे. ज्यामध्ये आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटना त्याला पाठिंबा देत आहेत. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय नेत्यांसह काही उद्योगपतीही दाऊद आणि आयएसआयच्या निशाण्यावर आहेत.

UN कडे $25 दशलक्ष इनाम जाहीर

खुलासा करताना असेही सांगण्यात आले की दाऊदची टीम भारतात उपस्थित असलेल्या लष्कर, जेएम आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांनाही मदत करू शकते. जेणेकरून देशात दहशतवादी कारवाया करता येतील. 2022 च्या सुरुवातीपासून NIA ने 29 ठिकाणी छापे टाकले आहेत. यातील सर्वाधिक छापे मुंबईत (Mumbai) झाले आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दाऊद इब्राहिमवर 25 मिलियन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com