लहान मुलांवर कोव्हॅक्सिनच्या ट्रायलला DCGI कडून  मंजूरी  

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

नवी दिल्लीः भारतीय औषध महानियंत्रकाने  (डीसीजीआय) स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा लसीला 2 वर्षावरील मुलांवर चाचणी  करण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्लीः भारतीय औषध महानियंत्रकाने  (डीसीजीआय) स्वदेशी बनावटीच्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा लसीला 2 वर्षावरील मुलांवर चाचणी  करण्याची परवानगी दिली आहे.  देशात जानेवारी महिन्यातच लसीकारण मोहिमेला सुरवात झाली. त्यानंतर आघाडीवर काम करणारे कर्मचारी, म्हणजे डॉक्टर्स, पोलिस, स्वच्छता कर्मचारी आदिना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. त्यानंतर 45 वर्षावरील  नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी  देण्यात आली तर 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र 18 वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण करण्याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतला नव्हता. मात्र आता  डीसीजीआय'ने 2 वर्षावरील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या क्लिनिकल चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.  (DCGI approves trial of covacin on young children) 

COVID-19 Vaccine: कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याची मागणी
 
देशाचे राष्ट्रीय नियामक,  भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी  काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर  विषय तज्ञ समिती (एसईसी) ची शिफारस मान्य करण्यात आली.  त्यानंतर बुधवारी स्वदेशी बनावटीची लस उत्पादक कंपनी भारत बायोटेक लिमिटेडला 2 ते  18 वर्षे वयोगटातिल मुलांवर कोवॅक्सीन (कोविड प्रतिबंधक लस ) लसीच्या   दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्यासाठी  परवानगी  देण्यात आली.  त्याचबरोबर,  भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड ने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सीन लसीच्या  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात  येणार आहे.  या चाचणीत, 0 दिवस  आणि  28  दिवसा दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जाणार आहेत.  जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) (कोविड -19) कडून  11 मे  रोजी विचारात घेण्यात आला. समितीने तपशीलवार विचारविनिमयानंतर प्रस्तावित  दोन / तीन टप्प्यातील मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस केली. 

दरम्यान, यूएस फूड अँड ड्रग अँडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने एका महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये फायझर-बायोटेनक कोविड लस मुलांच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. ही लस किशोरांना म्हणजेच 12-15 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. या आठवड्यात यूएसमध्ये 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण सुरू होऊ शकते. एफडीएचे कार्यवाहक आयुक्त जेनेट वुडॉक यांनी कोरोना साथीच्या विरूद्ध लढ्यात ही महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.  फायझर व्यतिरिक्त, मॉडर्ना देखील मुलांच्या लसीकरणासाठी चाचणी घेत आहे आणि लवकरच त्याचे निकालही समोर येऊ शकतात. विशेष म्हणजे एफडीएने आतापर्यंतच्या दोन कंपन्यांच्या निकालावर विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिकेची आणखी एक कंपनी नोवाव्हॅक्सकडे अंतिम टप्प्यात कोविड -19 ची लस आहे आणि त्यानीही 12 ते 17 वर्षांच्या मुलांवर अभ्यास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या